ए अल्लाह रहेम कर...! पावसासाठी मुस्लिम बांधवांची प्रार्थना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

सोयाबिन जोमात असतांना पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पाऊस पडावा यासाठी हिमायतनगर तालुक्यातील कामारी गावात वरूनराजाला प्रसन्न करण्यासाठी गुरूवारी (ता. १३) येथील मुस्लिम बांधवांनी गांधी चौकात देवाला साकडे घालत प्रार्थना केली व पंगतीचे आयोजन केले होते.

पावसाने दडी मारल्याने कामारी सर्कल परिसरातील शेतकरी हवालदिल

नांदेड : सोयाबिन जोमात असतांना पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पाऊस पडावा यासाठी हिमायतनगर तालुक्यातील कामारी गावात वरूनराजाला प्रसन्न करण्यासाठी गुरूवारी (ता. १३) येथील मुस्लिम बांधवांनी गांधी चौकात देवाला साकडे घालत प्रार्थना केली व पंगतीचे आयोजन केले होते.

या वेळी मौलाना आ. रऊफ, हाजी मुस्तफा साहब, लतिफ भाई, मेहमुद भाई, रफीक,इनुस, सासीन साहब, ग्रामपंचायत सदस्य शिवाजीराव शिरफुले, संजय मोरे, अशोक शिरफूले, राजेंद्र कदम, पोलिस पाटिल भिंमराव देवराये, माधवराव शिरफूले, आर.जि. शिरफूले, रवि पेंशनवार, जोगेंद्र नरवाडे, बाळू सावकार आदिसह गावारील नागरिकांनीही यात सहभाग नौंदवला. कामारी सर्कल परिसरात अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने शेतातील सोयाबिन, कापूस, तूर पिकाने माना टाकल्या आहेत. एक-दोन दिवसात चांगला पाऊस आला नाही तर त्याचा परिणाम उत्पन्नावर होण्याची शक्यता आहे. तालुक्यात सुरूवातीला पावसाने दमदार हजेरी लावली.

शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु, आता पावसाने दडी मारली आहे. बहरलेला हंगाम धोक्यात सापडला आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुटली असून, पिके माना टाकत आहे. पिके वाळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पूर्वी कपाशीतून उत्पन्न मिळविणारा तालुक्यातील शेतकरी नगदी पीक असलेल्या सोयाबीनकडे वळला आहे. तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. परंतु, पावसाने दडी मारल्याने पीक माना टाकत आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे ते शेतकरी ओलित करीत आहे. परंतु, तालुक्यातील ८० % शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. येत्या तीन-चार दिवसात चांगला पाऊस न झाल्यास खरिपाची पिके हातून जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आता पावसाची आवश्यकता असताना पाऊस येत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसासाठी देवाला साकडे घातले जात आहे.

■ ई सकाळवरील महत्वाच्या ताज्या बातम्या
परभणी: दूबार पेरणीच्या संकटाने युवकाची आत्महत्या
साहेब, आम्ही दारिद्र्यातच जीवन जगावे का?
बारामती-फलटण रेल्वेमार्ग संपादनासाठी शेतकऱ्यांच्या सहकार्याची अपेक्षा
सिंधुदुर्ग-कणकवली रेल्वे मार्गावर माती कोसळल्याने रेल्वे वाहतूक दोन तास ठप्प
मराठवाड्यात मुलीच्या लग्नाच्या चिंतेने शेतकऱ्याने संपविले जीवन
गेल्या महिन्याभरात साडेतीन हजार "चाईल्ड पोर्नोग्राफी' साईट्‌स बंद
नांदेडमध्ये वाहतूक शाखेची अडीच महिण्यात दमदार कारवाई
पुणेः नगरमध्ये ज्येष्ठ नागरिकाचा खून करणारे दांपत्य ताब्यात
'एलआयसी'चे एयर इंडिया करू नका !; 'जीएसटी'ही काढा
भारतातील "फेसबुक युजर्स'ची संख्या जगातील सर्वोच्च...