कल्याण-डोंबिवलीत प्लॉस्टिक बंदी असतानाही लपवून वापर सुरूच

रविंद्र खरात
गुरुवार, 6 जुलै 2017

कल्याण: 15 जुलै पासून कल्याण-डोंबिवलीमध्ये प्लास्टिक बंदी जाहिर केली असताना आज ही कल्याण डोंबिवली शहरात लपवून वापर सुरु आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत प्लास्टिक बंदी आणि निर्मिती बाबत ठराव मंजूर करून राज्य शासनाकडे पाठवावा, अशी मागणी कल्याण मधील सामाजिक संघटना सहयोगचे अध्यक्ष विजय भोसले यांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याकडे केली आहे.

कल्याण पूर्व मधील सामाजिक संघटना सहयोगच्या माध्यमातून मागील वर्षभरात कल्याण पूर्वमध्ये प्लास्टिक बंदी बाबत मोहिम राबविण्यात आली. संस्थेच्या माध्यमामधून 50 माइक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या, थर्माकॉल प्रति किलो 7 रुपयाने खरेदी केला जातो. गेली वर्षभर घरोघरी, शाळेत कॉलेजमध्ये जावून प्लास्टिक पिशव्या वापर टाळा याबाबत प्रबोधन ही करण्यात आले. मात्र, नागरिक, व्यापारी, दुकानदार त्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरुच ठेवला आहे. यामुळे वापर करणाऱ्यावर कठोर कारवाई सोबत दंडामध्ये बदल करणे आवश्यक असून, त्यात ती तरतूद करण्याची मागणी सहयोग या सामाजिक संघटनेने केली आहे.

दरम्यान, अनेक सामाजिक संघटनाच्या सूचनेनुसार महापौर राजेंद्र देवळेकर यांनी कल्याण-डोंबिवली महानगर पालिका हद्दीत प्लास्टिक बंदीची घोषणा केली आहे. प्रशासन त्याची तयारी करत असली तरी याबाबत महासभेत याबाबत प्रस्ताव मंजूर करत प्लास्टिक निर्मितीवर बंदी आणावी. याबाबत राज्य शासनाकडे मागणी कल्याण पूर्व मधील सामाजिक संघटना सहयोग संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले यांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याकडे केली असून, महापौर राजेंद्र देवळेकर काय भूमिका घेतात याकडे लक्ष्य लागले आहे.