कल्याणमधील दुकानाच्या पाट्यांवरील कारवाई थांबवा

शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

  • फुले शाहू आंबेडकर विचार मंचची मागणी...
  • ड प्रभाग क्षेत्र कार्यालय वर व्यापाऱ्यांची धडक

कल्याण : पालिकेच्या वतीने कल्याण पूर्व मध्ये अनेक ठिकाणी फुटपाथ मोकळे करत असताना दुकानादारांचे पोस्टर्स, शेड, आणि पाट्यावर कारवाई ही चुकीच्या पद्धतीने राबवली जात असून ती न थांबविल्यास उग्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक महादेव रायभोळे यांनी आज पालिका अधिकारी वर्गाला दिला .

कल्याण पूर्व मधील पालिकेचे ड आणि जे 4 प्रभाग क्षेत्र कार्यालय मार्फत फुटपाथ मोकळे करण्याचे  कारवाई सुरू आहे यात दुकानदारांनी अतिरिक्त सामान ठेवणे, शेड बांधणे, पोस्टर, पाट्या लावले आहेत यावर धडक कारवाई केल्याने व्यापारी वर्गात संतापाचे वातावरण आहे, आज शुक्रवार ता 22 सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास शेकडो व्यापारी एकत्र येऊन फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष आणि  माजी नगरसेवक महादेव रायभोळे, आणि दलित मित्र अण्णा रोकडे यांच्या नेतृत्वाखाली  ड  प्रभाग  क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाड यांची भेट घेत नाराजी व्यक्त केली, आणि निवेदन देत कारवाई न थांबल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला .

कल्याण पूर्व मधील श्रीराम टॉकीज ते विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक परिसर मधील रस्ता रुंदीकरण करण्यात आले त्यावेळी अनेक व्यापारी वर्गाने पालिकेला सहकार्य केले होते, नियमाचे पालन करत पुन्हा बांधकाम केले असताना त्यांना पुन्हा का वेठीस धरता असा सवाल व्यापारी वर्गाने केला आहे, अनधिकृत बांधकामावर कारवाई न करता सर्व सामान्य नागरिक आणि व्यापारी वर्गाला त्रास देण्याचे काम करत असल्याचा आरोप यावेळी व्यापाऱ्यांनी केला. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :