पाली भूतीवली धरणात भाईंदर येथील 2 जणांचा बुडून मृत्यू

हेमंत देशमुख
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

  • रविवारी सकाळी 7 ची घटना;
  • खोपोली येथील संस्थेला मृतदेह काढण्यात यश

कर्जत : कर्जत तालुक्यातील पाली भूतीवली धरणात रविवारी सकाळी सातच्या सुमारास भाईंदर येथील 2 जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अभिषेक जैन वय 27 आणि प्रदीप तावडे (वय 30, दोघे राहणार- भाईंदर, मुंबई) अशी बुडून मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत.

या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भाईंदर मुंबई येथील 12 तरुण कर्जत तालुक्यातील पाली भूतीवली धरणाजवळ शनिवारी 4 नोव्हेंबर रोजी मौजमजा करण्यासाठी आले होते. रात्री मौज मजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यातील एक जण धरणात अंघोळीसाठी उतरला. व तो पाण्यात गेल्या नंतर दुसराही पाण्यात उतरल्यावर पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे या पाली भूतीवली धरणात बुडाले. 

बुडालेल्या सोबत आलेल्यानी नेरळ पोलिसांना कळविले. त्यानंतर नेरळ पोलिसानी या बुडालेल्या तरुणांना काढण्यासाठी खोपोली येथील अपघात ग्रस्त संस्थेला बोलावले. खोपोली येथील टीम सकाळी 10:30 च्या सुमारास घटनास्थळी दाखल झाली आणि अवघ्या 15 मिनिटात या अपघात ग्रस्थ संस्थेला दोन्ही मृतदेह काढण्यात यश आले. हे दोन्ही मृतदेह काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी कर्जत येथील उपरुग्णालयात नेण्यात आले. 

याआधी ही या पाली भीतीवली धरणात  पावसाळी वर्षासहली साठी आलेल्या अनेक तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर या धरणावर कोणतीही सुरक्षा पाटबंधारे विभागाकडून ठेवण्यात आली नसल्याने  डीकसळ ग्रामस्थ ही आक्रमक झाले आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :