अज्ञात वन्यप्राण्यांकडून दोन शेळ्या फस्त

अमोल वाघमारे
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

संबंधित घटनेची दक्षता घेऊन उपाय योजना करावी व आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करावेत अशी मागणी

सावळीविहीर (जि. नगर) : राहाता तालुक्यातील सावळीविहिर बुद्रुक येथील कारवाडी भागातील आगलावे वस्तीवर अज्ञात वन्यप्राण्याकडून दोन शेळ्या फस्त केल्याचे आढळून आले. येथील शेतकरी राजेंद्र सोपान आगलावे यांच्या वस्तीवर ही घटना आज रात्रीच्या सुमारास घडली. यात त्यांचे गर्भावस्तेतील दोन शेळ्या अज्ञात वन्यप्राण्याने खाल्याने सुमारे 15 ते 20 हजाराचे नुकसान झाले.

शेकर्यांची कर्ज माफी झाली पण अजून कर्जमाफीचा लाभ नाही. महावितरणने वीज तोडली आणि आता अश्या प्रकारे झालेल्या आघाताने कटुंब कोसले असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व माननीय तहसीलदार यांनी संबंधित घटनेची दक्षता घेऊन उपाय योजना करावी व आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करावेत अशी मागणी आपत्ती ग्रस्त शेतकरी राजेंद्र आगलावे यांनी केली आहे.

उपसरपंच बाळासाहेब जपे यांनी या भागात शेळ्या गायब व्हायचे प्रमाण वाढत असून कारवाडी भागात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी केली. यावेळी गणेश आगलावे, सुनील आगलावे, विलास जपे, शिवाजी जपे, शिवाजी आगलावे, संजय आगलावे, आदी शेतकरी उपस्तीत होते. या घटनेमुळे सावळीविहिर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :