सांगलीत भरदिवसा युवकाचा खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

सांगली : सांगली शहरातील मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवनच्यासमोर आज (शुक्रवार) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शकील सरदार मकानदार (वय 34) या युवकाचा तीक्ष्ण हत्याराने वार करुन खून करण्यात आला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. गुंड बाळू भोकरे याच्या टोळीतील तो असल्याचे समजते. खुनाचे कारण स्पष्ट झाले नाही. मात्र पैशाच्या वादातून हा खून झाल्याची चर्चा घटनास्थळी होती.

याबाबत अधिक माहिती अशी, शहरात शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या सावंत प्लॉटमध्ये भरदिवसा आज खुनाचा थरार घडला. मराठा सेवा संघाच्या इमारतीसमोर शकील मकानदार याचा हत्याराने वार करुन खून केला. हल्लेखोर एकापेक्षा अधिक असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे. घटनास्थळापासून काही मीटरवर दोन दुचाकी वाहने फोडलेल्या अवस्थेत सापडली आहेत. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. दिपाली काळे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार शकील मकानदारसह इतरजण दोन दुचाकीवरुन मराठा सेवा संघाच्या परिसरात आले होते. तेथे त्यांच्यात वादावादी झाली. यातून दोन्ही गाड्या फोडण्यात आल्या. गाड्यांवर दगड घालून त्यांची मोडतोड करण्यात आली. या भांडणात शकील तेथून पळून जात असताना त्याचा पाठलाग करुन त्याच्यावर वार करण्यात आला. डोक्‍याच्या मागे वार झाल्याने तो जागीच ठार झाला. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली होती.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: sangli news youth murder in sangli