बेताच्या परिस्थितीत 18 अनाथ मुलांचे घेतले पालकत्व

विलास खबाले
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

तीन मुले नजीकच्या माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत आहेत. अन्य जिल्हा परिषद व आंगवाडीत आहेत. प्रसंगी त्या मुलांचे उत्साहात वाढदिवस ते साजरे करतात. सौ. नदाफ मुलांना नाष्टा जेवण कपडे धुणी भांडी करते. तर आई वडील त्यांना आघोळ घालतात. समीर नदाफ स्वतः त्याची आभ्यासिका घेतात.

विंग : अतंत्य बेताच्या परस्थितीवर मात करत कोळे येथील समीर नदाफ यांनी अठरा अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारले आहे. जिजाऊ अनाथ आश्रमाच्या माध्यामातून त्यास दोन वर्षे झाली. अतिशय जिद्दीने व जबाबदारी ते सांभळले आहे. मात्र त्या मुलांना आज खरी गरज आहे. समाजातून अर्थिक मदतीची व दातृत्व दाखवणाऱ्या व्यक्तीची.

सध्याचे जीवन धकाधकीचे झाले आहे. त्यामध्ये कुटुंब चालवताना अनेक संकटांशी तोंड द्यावे लागत असते. अनाथ व भीक मागणाऱ्यांच्या बाबतीत साधी सहानुभूती दाखवली जात नाही. अशा परस्थितीत मात्र कोळे येथील समाजसेवक समीर नदाफ कुंटुबीय त्याला आपवाद आहेत. त्यांची घरची परस्थिती बेताची आसताना मात्र त्यावर मात करत त्यांनी अठरा अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारले. ते सांभाळले आहे.

नदाफ कुंटुबीय गाद्या दुरुस्तीचा व्यवसाय करते. अतिशय बेताच्या परस्थितीत आई वडील, पत्नी व मुले एकत्रीत पारंगत व्यवसाय पुढे सुरू आहे. त्यासाठी सातारासह अन्य जिल्ह्यात ते फिरतात. सांगली, मिरज बसथांब्यावर भीक मागत फिरताना काही अनाथ मुले आढळली. त्यांनी त्याचा सांभाळ करण्याचे ठरविले. अणि कायदेशीर पोलिसाच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतले. त्यास दोन वर्षे झाली. त्यासाठी कोळेत जिजाऊ सेवाभावी संस्थेच्या नावाने अनाथाश्रम सुरू केले. त्याचे रजिष्ट्रेशनही केले. आश्रमात सध्या दोन ते आकरा वयोगटातील १० मुली व आठ मुले आहेत. नदाफ कुंटुबीय त्याचा पालनपोषण करत आहे. त्यांना शिक्षणही देत आहे.

तीन मुले नजीकच्या माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत आहेत. अन्य जिल्हा परिषद व आंगवाडीत आहेत. प्रसंगी त्या मुलांचे उत्साहात वाढदिवस ते साजरे करतात. सौ. नदाफ मुलांना नाष्टा जेवण कपडे धुणी भांडी करते. तर आई वडील त्यांना आघोळ घालतात. समीर नदाफ स्वतः त्याची आभ्यासिका घेतात. बंधू शकील यांचे योगदान मिळते. केवळ गाद्या दुरूस्ती व्यवसायातून अनाथ मुलांच्या पलकत्व स्वीकारून जबाबदारी ते सांभाळले आहे. सामाजिक बांधिलकी जपत इतरापुढे दातृत्वाचा आदर्श त्यांनी ठेवला आहे. कोळेतील प्राथमीक आरोग्य केंद्राचे वैधकीय अधिकारी सुशील घोगरे व त्यांच्या मित्र परिवाराने त्याठीकाणी नुकतीच भेट दिली. व रोख रक्कम व जीवनाश्यक वस्तू त्यांना भेट दिल्या. शैक्षणिक साहित्य दिले. मात्र अलिकडे त्या मुलांचा खर्च वाढू लागल्याचे ते सांगतात. नदाफ कुंटुबियांना त्यासाठी झगडावे लागत आहे. समाजातून येणारी तुटपुंजी मदतही अपुरी पडू लागली आहे. समाजात अनेक दानशूर व्यक्ती आहेत. त्या अनाथ मुलांना खरी गरज त्यांची आहे. अशा व्यक्तीना नदाफ कुंटुबीयांनी त्यासाठी आवाहन केले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: satara news poverty ridden samir nadaf adopts 18 children