वर्गणी घेता की खंडणी मागता?; व्यापाऱयांची संरक्षणाची मागणी

स्वप्निल जोगी
शनिवार, 15 जुलै 2017

पुणे: निरनिराळे उत्सव सुरू झाले म्हणजे नागरिकांसाठी खरंतर कोण आनंदाची बाब! पण हेच उत्सव समाजातील अनेकांसाठी 'वर्गणी'च्या रूपात एक सक्तीचा जाच घेऊन येत असल्याचे चित्रही याच आनंदाच्या सोबतीने पाहायला मिळते, हे नाकारता येत नाही. याच पार्श्‍वभूमीवर शहरातील "वर्गणीगुंडां'पासून आपल्याला संरक्षण मिळावे आणि आपला व्यवसाय सुरक्षित वातावरणात करता येण्याची हमी मिळावी, अशी मागणी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी असोसिएशनने केली आहे.

शहरातील आणि उपनगरांतील अनेक भागांत स्वयंघोषित "दादा' आणि घोळक्‍याने येणारे गुंड विविध उत्सवांसाठी वर्गणी मागतात की बळजबरीने खंडणी वसूल करायला येतात, असा सवालही असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.

या गुंडांविषयी तक्रार करण्याचा प्रयत्न केल्यास अनेकदा पोलिस ती दाखल करून घेण्यास टाळाटाळ करतात, अनेकदा त्यावर कारवाई होण्यास विलंब होतो, तर कित्येकदा स्थानिक दबावही टाकला जातो, अशी कैफियत या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी मांडली. पोलिस आणि प्रशासनाने व्यापाऱ्यांना भयमुक्त वातावरणात व्यवसाय करण्याची व्यवस्था निर्माण करायला हवी, तसेच व्यापाऱ्यांवर होणारे हल्ले तातडीने थांबायला हवेत, अशी मागणी त्यांनी केली.

ई सकाळवरील ताज्या बताम्यांसाठी क्लिक करा :