मलठणला रोहित्र फोडून तांबे पळविले

युनूस तांबोळी
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

टाकळी हाजी (ता. शिरूर, पुणे): शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात चोरट्यांनी घुमाकूळ घातला असून मलठण (ता. शिरूर) येथील शिंदेवाडी येथे विद्युत रोहित्र चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या बाबत टाकळी हाजी औटपोस्ट मध्ये पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाकळी हाजी (ता. शिरूर, पुणे): शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात चोरट्यांनी घुमाकूळ घातला असून मलठण (ता. शिरूर) येथील शिंदेवाडी येथे विद्युत रोहित्र चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या बाबत टाकळी हाजी औटपोस्ट मध्ये पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मलठण येथील शिंदेवाडी मध्ये पिराचा दर्गा आहे. मलठण-कवठे रस्त्यावर असणाऱ्या दर्ग्याच्या बाजूला महावितरणचे 100 केव्हीचे ट्रान्सफार्मर आहे. सोमवार (ता. 6) रात्रीच्या वेळी चोरट्यांनी हा ट्रान्सफार्मर खांबावरून खाली ढकलून दिला. त्यातील ऑईल व तांब्याचे साहित्य लंपास केले. या बाबत सोसायटीचे माजी अध्यक्ष दत्तात्रेय गायकवाड यांनी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांना माहिती दिली. त्यानतर येथे पंचनामा करण्यात आला आहे. या वर्षी उत्तम पावसामुळे परीसरात पाण्याची उपलब्धता आहे. त्यात रोहित्र चोरीला गेल्याने या परीसरातील शेतकऱ्यांना औंदा पाणी हाय तर ईज नाय... असे म्हणत परिस्थीतीला सामोरे जावे लागत आहे. सध्या कांदा पिकाची लागवड सुरू असताना ऐनवेळी येथील रोहित्र चोरीला गेल्याने लागवडी खोळंबल्या आहेत. पिके देखील सुकू लागली आहेत. तातडीने येथील रोहित्र बसविण्यात यावा. अशी मागणी या परीसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

या बाबत कुंटे म्हणाले की, पोलिसांची रात्रीची गस्त सुरू आहे. गावागावात दुकानदारांनी सीसीटीव्ही बसवून घ्यावेत. तरूणांनी रात्रीची गस्त घालण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. टाकळी हाजी कुंड पर्यटनस्थळी हिरो होंडा कंपनीची दुचाकी एम. एच. 15 बी. क्यू 8712 दोन दिवसापासून उभी आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :