केंद्र आणि राज्य सरकार सर्व स्तरावर अपयशी: अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

केंद्र आणि राज्य सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरल्याची टीका करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी जनता अस्वस्थ असल्याचे सांगत शासनाने ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे, त्यांची यादी जाहीर करावी, असे आव्हान सरकारला दिले आहे.

नंदूरबार - केंद्र आणि राज्य सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरल्याची टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जनता अस्वस्थ असल्याचे सांगत शासनाने ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे, त्यांची यादी जाहीर करावी, असे आव्हान सरकारला दिले आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता आढावा बैठकीत पवार बोलत होते. ते म्हणाले, "किती दिवस गप्प बसायचे. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया जात आहे. बॅंकाना योग्य निर्देश नाहीत त्यामुळे बॅंकाही संभ्रमावस्थेत आहेत. शेतकरी संभ्रमित झाले आहेत. घोषणा करतात, त्या सत्यात उतरत नाहीत. सर्व खेळखंडोबा चालला आहे. बॅंकांच्या बाहेर ढोल बढवून काय होणार? शेतकरी आडला आहे. त्यातून त्यांना बाहेर काढायचे आहे. शेती मालाला भाव नाही. शेतकऱ्यांना जगण्यासाठी ताकद दिली पाहिजे. हे सर्व खपवून घेतले जाणार नाही.'

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माहिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, ऍड. गायकवाड, प्रमोद हिंदूराव, स्मिता पाटील, ईश्वर बाळ पूरे, शिवाजी पाटील, जिल्हा प्रभारी उमेश पाटील, जिल्हाध्यक्ष गावित, माजी आमदार शरद गावित, सागर तांबोळी आदी उपस्थित होते. यावेळी तटकरे आणि चित्रा वाघ यांनीही मार्गदर्शन केले.

■ ई सकाळवरील महत्वाच्या ताज्या बातम्या
परभणी: दूबार पेरणीच्या संकटाने युवकाची आत्महत्या
साहेब, आम्ही दारिद्र्यातच जीवन जगावे का?
बारामती-फलटण रेल्वेमार्ग संपादनासाठी शेतकऱ्यांच्या सहकार्याची अपेक्षा
सिंधुदुर्ग-कणकवली रेल्वे मार्गावर माती कोसळल्याने रेल्वे वाहतूक दोन तास ठप्प
मराठवाड्यात मुलीच्या लग्नाच्या चिंतेने शेतकऱ्याने संपविले जीवन
गेल्या महिन्याभरात साडेतीन हजार "चाईल्ड पोर्नोग्राफी' साईट्‌स बंद
नांदेडमध्ये वाहतूक शाखेची अडीच महिण्यात दमदार कारवाई
पुणेः नगरमध्ये ज्येष्ठ नागरिकाचा खून करणारे दांपत्य ताब्यात
'एलआयसी'चे एयर इंडिया करू नका !; 'जीएसटी'ही काढा
भारतातील "फेसबुक युजर्स'ची संख्या जगातील सर्वोच्च...

उत्तर महाराष्ट्र

नाशिक - पश्‍चिम पट्ट्यातील तालुक्‍यात मंगळवारी (ता.19) सायंकाळपासून पुन्हा दमदार पाऊस सुरू झाला आहे. रात्रीच्या मुसळधार पावसानंतर...

01.39 AM

वणी (नाशिक): सप्तश्रृंगी गडावर नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेस आदिमायेचे दर्शनासाठी येणाऱ्या केळी रुम्हणवाडी (ता. अकोले) येथील...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

वणी (नाशिक) :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत सप्तशृंग मातेच्या नवरात्रोत्सवास उद्या (गुरुवार) पासून उत्साहात सुरुवात होत असून,...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017