चाळीसगाव : मन्याड धरण 20 टक्के भरले

शिवनंदन बाविस्कर
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

पिलखोड (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव तालुक्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या मन्याडच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरण मृतसाठ्याच्या गर्तेतून बाहेर आले आहे. त्यामुळे आज पहाटे धरणाचा जिवंत पाणीसाठा 20 टक्के झाला आहे, अशी माहिती धरणाचे सहाय्यक अभियंता हेमंत पाटील यांनी 'सकाळ'ला दिली.

मन्याड धरणाच्या पाण्यावर तालुक्यातील 22 खेड्यांची रब्बी हंगामाची भिस्त आहे. तर 11 गावांची पाणीपुरवठा योजना अवलंबुन आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच निम्म्या तालुक्याचे लक्ष मन्याड धरणाकडे लागुन आहे. पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे मन्याडच्या वरती असलेले माणिकपुंज धरण चार दिवसांपुर्वी ओव्हरफ्लो झाले. त्याचे पाणी मन्याडमध्ये दाखल झाले आहे. मन्याडमध्ये परवापर्यंत मृतसाठ्याच्या निम्मे साठा होता. 

धरणाची एकुण साठवण क्षमता 1 हजार 905 दशलक्ष घनफुट असून मृतसाठा 483 दशलक्ष घनफुट एवढा आहे. माणिकपुंजमधुन सुरु असलेल्या आवकमुळे बुधवारी(ता. 20) सायंकाळी धरणाचा मृतसाठा पुर्ण झाला. परिसरात झालेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक सुरु आहे. आज पहाटे धरणात 760 दशलक्ष घनफुट एवढा एकुण पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे धरण 20 टक्के भरले आहे. अशी माहिती धरणाचे सहाय्यक अभियंता हेमंत पाटील यांनी 'सकाळ'शी बोलतांना दिली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :