जळगाव जिल्ह्यातील साडेतीनशे कोटींचे व्यवहार ठप्प!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय संप; मुख्य शाखेबाहेर निदर्शने

जळगावः अनेक वर्षांपासून न्याय व कायदेशीर मागण्यांच्या न्यायासाठी बॅंक कर्मचारी प्रतिक्षेत आहेत. याबाबत लक्ष दिले जात नसल्याने राष्ट्रीयकृत बॅंकांमधील कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारून काम बंद केले आहे. बॅंका बंद असल्याने जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बॅंकांमधून होणारे तिनशे ते साडेतीनशे कोटी रूपयांचे व्यवहार थांबले आहेत.

सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमध्ये कार्यरत असलेले सर्व कर्मचारी व अधिकारी संघटनांनी एकसंघपणे युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनमार्फत सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात एकत्रित येवून संपाचे हत्या उपसले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बॅंक कर्मचारी मागण्यांना न्याय मिळेल याच्या प्रतिक्षेत आहेत. परंतू, सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने बॅंक कर्मचाऱ्यांनी आज (ता.22) एक दिवसीय संप पुकारला आहे. यात शहरातील सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी भारतीय स्टेट बॅंकेच्या मुख्य शाखेबाहेर सकाळी साडेदहाला निदर्शने आंदोलन केले. यावेळी भालचंद्र कोतकर, श्‍याम पाटील, विजय सपकाळे, बाबुलाल चव्हाण, अशोक देवरे, मधु अहिरे, प्रसाद पाटील, संतोष कातकाडे, सुधीर पाटील आदी उपस्थित होते.

व्यवहार थप्प
राष्ट्रीयकृत बॅंक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून, यात जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बॅंकेत कार्यरत असलेले साडेचारशे कर्मचारी सहभागी झाले होते. परिणामी बॅंकांमधील संपुर्ण व्यवहार बंद असल्याने चेक क्‍लिअरन्स देखील झाले नाही. यामुळे दिवसभरात होणारे साधारण साडेतिनशे कोटी रूपयांचे व्यवहार थप्प झाले आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
मराठ्यांनो, जातीय अस्मितेच्या विळख्यातून बाहेर पडा...
‘आई, तिला विचार तू का आलीस?’
तुरुंगातील 'व्हीआयपी' बडदास्त सीसीटीव्हीतून उघड
डोकलामप्रश्‍नी लवकरच तोडगा निघेल : गृहमंत्री
भाजप सुसाट; "राष्ट्रवादी' सपाट 
डेंगीचा आजपासून नायनाट
राज ठाकरे आज पुण्यात 
भाजपच्या भूमिकेमुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबला
तातडीचे कर्ज फक्त २४ हजार शेतकऱ्यांना
स्वाइन फ्लूचे अत्यवस्थचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात