चाळसगावमध्ये बाजार समितीच्या संचालकाच्या मुलाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

मेहुणबारे (ता. चाळीसगाव, जि. जळगाव): चाळीसगाव कृर्षीउत्पन्न बाजार समितीचे संचालक बारीकराव रामा वाघ यांच्या लहान मुलाचा मृतदेह स्व:ताच्या विहीरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव, जि. जळगाव): चाळीसगाव कृर्षीउत्पन्न बाजार समितीचे संचालक बारीकराव रामा वाघ यांच्या लहान मुलाचा मृतदेह स्व:ताच्या विहीरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.

दहिवद (ता. चाळीसगाव) येथील बारीकराव रामा वाघ यांचा लहान मुलगा श्याम बारीकराव वाघ (वय 27) हा तरूण तीन दिवसापासून घरातून बेपत्ता झाला होता. आज (शुक्रवार) सकाळी साडेअकरा वाजता  त्यांच्या स्वतःच्या शेतात मजूर कामासाठी गेले होते. ते विहीरीत पाणी  काढण्यासाठी गेले असता त्यांना मृतदेह पाण्यावर तरंगत असताना दिसला व एकच खळबळ उडाली. मृतदेह विहिरीच्या बाहेर काढून सायंकाळी पाच वाजता चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: