युवा शेतकऱ्याची आत्महत्या

श्रीधर ढगे
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

दार उघडून पाहिले असता राहुल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. हे चित्र पाहून त्याची आई जमिनीवर कोसळून बेशुद्ध पडली.

पातुर्डा फाटा : संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा खुर्द येथील एका युवा शेतकऱ्ने राहत्या घरातील छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली. 

राहुल जनार्दन म्हसाळ (२५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. राहूल व त्याचे आई, वडील शेतात गेले होते. आभाळ भरून आल्याने घराच्या गच्चीवर टाकलेले तीळ झाकण्यासाठी तो घरी परतला. आई शेतातील कामे आटोपून घरी परतली. दार उघडून पाहिले असता राहुल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. हे चित्र पाहून त्याची आई जमिनीवर कोसळून बेशुद्ध पडली.

पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीन व मुगाचे पीक चांगले येऊ शकले नाही. म्हसाळ कुटुंब शेतीवरच अवलंबून आहे. त्याचा लहान भाऊ अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असल्याने मोठा खर्च येत आहे. नापिकीच्या नैराश्यातून राहूलने आत्महत्या केली.  

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :