राज्यात सरपंच निवडणूकीमध्ये भाजपने उघडले खाते

राज्यात सरपंच निवडणूकीमध्ये भाजपने उघडले खाते

कोंटी ग्रा.पं.वर भाजपाचा झेंडा; सरपंचासह सर्व सदस्य अविरोध

खामगाव (बुलढाणा) : राज्यात थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय घेतल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील कोंटी ग्रामपंचायतीवर भाजपने झेंडा फडकवित कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर व आमदार आकाश फुंडकर यांच्या पुढाकाराने सरपंचासह सर्व सदस्यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने अविरोध निवडणुक करीत राज्यात पहिले खाते उघडले आहे.

खामगाव मतदार संघातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी गावातील सर्व मतभेद बाजुला ठेऊन अविरोध निवडून आणण्याचे आवाहन केले होते. दरम्यान आज ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुकांचे अर्ज भरण्याचा अंतिम दिवस होता.  कोंटी, सारोळा, गेरु या ग्रामपंचायती साठी भाजप प्रणित पॅनलच्या सरपंच व सदस्यांचे अर्ज प्राप्त झाले. त्यांचे विरोधातकोणत्याही पक्षाचे पॅनलच्या उमेदवारांनी एकही अर्ज भरला नाही. त्यामुळे भाजपचे सर्व उमेदवार अविरोध निवडून आले आहेत.निवडणुक प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर त्यांची अधिकृत घोषणा निवडणुक विभाग करणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच सरपंच थेट जनतेतून होत असतांनाही अविरोध निवडणुक झाल्याने राज्याचे कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर व आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले. कोंटी, सारोळा, गेरु या ग्रा.पं.वर सरपंचपदी पुन्हा सौ. इंदुताई संजय ठोंबरे, तर ग्रा.पं.सदस्य म्हणून विजयरामसिंह सोळंके, सौ. छाया गोविंदा हलोडे, विलास हरिशचंद्र जाधव, सौ. इंदु दिनकरधंदरे, सोमनाथ सदाशिव ठोंबरे व सौ. सुमनशिवाजी तनमर हे अविरोध निवडून आले आहेत.

सलग पाचव्यांदा अविरोध निवडून कोंटी, सारोळा, गेरु ग्रामपंयातची सलग पाचव्यांदा अविरोध निवडूक झाली आहे. भाजपाचे नेते तसेच दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष शांताराम बोधे यांचेमार्गदर्शनात पुन्हा एकदा अविरोधनिवडणूक पार पडली. विशेष म्हणजे सरपंचथेट जनतेतून असतांना तीन गावाच्या याग्रा.पं.निवडणुक अविरोध होणे हा इतरगावांसाठी आदर्श आहे.

कोंटीचा आदर्श इतर गावक-यांनी घ्यावाः आमदार आकाश फुंडकर
ग्रा.पं.निवडणुकीवेळी गावातील वातावरण संवेदनशील असते. अनेकवेळावाद निर्माण होतो. त्यामुळे गावाचे वातावरणखराब होते. त्यामुळे गावाच्या विकासासाठीसर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. गावाच्याशांततेसाठी व विकासासाठी कोंटी ग्रा.पं.चा आदर्श इतर गावांनीही घ्यावा, असे आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com