सातशेच्या वर लोकसंख्या असलेले गाव वाऱ्यावर...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

चिमूर (चंद्रपूर): चिमूर तालुक्यातील नेरी सिरपुर पंचायत समीती क्षेत्र अंतर्गत येणारे सडपार गाव चिमूर नगर परीषद निर्मीती पुर्वी काग गट ग्रामपंचायत मध्ये समाविष्ठ होते. मात्र, चिमूर नगर परीषदमध्ये सोनेगाव आणी काग या ग्रामपंचायत समाविष्ठ करण्यात आला. त्यामुळे काग गट ग्रामपंचायतीमधील सर्व रेकार्ड चिमूर नगर परिषदेला जमा करण्यात सरडपार सातशेच्या वर लोकसंख्या असलेले गाव वाऱ्यावर सोडण्यात आले आहे.

चिमूर नगर परीषदेच्या निर्मितीमुळे चार वर्षापासुन सर्व प्रकारच्या योजना पासुन वंचित आहेत. या विषयी सरडपार वासीयांच्या वतीने शासण प्रशासनाला गावास ग्रामपंचायतीचा दर्जा मिळावा अथवा म्हसली ग्रामपंचायतीस जोडण्यात यावे या विषयी अनेकदा निवेदने देण्यात आली. पंचायत समितीकडून म्हसली ग्रामपंचायतीस गाव जोडण्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, म्हसली ग्रामपंचायती मध्ये सरडपार गावाचे कोणतेही रेकॉर्ड आले नसल्याने घर का ना घाट का अशी अवस्था गावकऱ्यांची झालेली आहे.

सरडपारच्या या अवस्थेला न्याय देण्याच्या उद्देशाना चिमुर तालुका शिवसेनेच्या वतीने उप-विभागीय अधिकाऱ्या मार्फत मुख्यमंत्री, महसुल मंत्री, जिल्हयाचे पालकमंत्री व आमदार बानुभाऊ धानोरकर यांचेकडे निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले आहे . शिवसेना तालुका प्रमुख धरमसिंह वर्मा यांच्या नेतृत्वात सदानंद धारणे, श्रीराम कुंभरे, रामचंद्र सहारे, गुरुदास पाटील, उत्तम धारणे, ज्ञानेश्वर रदंये इत्यादी सरडपार वासीयांनी तहसीलदार संजय नागटिळक यांचेकडे निवेदन देण्यात आले.

अनुसुचित जाती व जमाती बहुल असलेल्या सरडपारला प्रशासणाच्या चुकीने शासकिय योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यां विरोधात फौजदारी गुन्हा नोंदवून अनुसुचित जाती जमाती प्रतिबधक कायद्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने तिव्र आंदोलन करण्यात येईल.
- धरमसिंह वर्मा, शिवसेना तालुका प्रमुख, चिमूर

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :