esakal | माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांनी घेतली लस
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Corona News Former Minister of State Subhashrao Thackeray took the vaccine

 ६० वर्षे वयोगटातील जेष्ठ नागरिकांना येथील ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्रांवर कोरोना लस देण्यात येत आहे. ता १ पासून या लसीकरणाला प्रारंभ झाला असून ता २ रोजी माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांनीही लस घेतली.

माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांनी घेतली लस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

मंगरुळपीर (जि.वाशीम) : ६० वर्षे वयोगटातील जेष्ठ नागरिकांना येथील ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्रांवर कोरोना लस देण्यात येत आहे. ता १ पासून या लसीकरणाला प्रारंभ झाला असून ता २ रोजी माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांनीही लस घेतली.


ऑनलाईन आणि प्रत्यक्ष नोंदणी करून ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.तसेच, दुसऱ्या टप्प्यातील कोविड - १९ वॉरियर्सचेही लसीकरण या ठिकाणी सुरू आहे. ता २ पर्यंत दोनशेच्या वर जेष्ठ नागरिकांचे लसीकरण झाले असल्याची माहिती वैध्यकीय अधीक्षक डॉ एल एन चव्हाण यांनी दिली.

तर ता २ रोजी माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांनीही आज ग्रामीण रुग्णलयात  सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतला. कोरोना लसीकरणाचा सुरू असलेल्या तिसऱ्या टप्या मध्ये सर्व जेष्ठ नागरिकांना लस देण्यात येत आहे,

ही लस सुरक्षित असून सर्वांनी नोंदणी  करून लस घेण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.यावेळी वैध्यकीय अधीक्षक डॉ एल एन चव्हाण,डॉ रमेश आडे,सेविका सविता उबाळे,शरद गावंडे,प्रकाश संगत,जावेद अली फारुखी आदिंची उपस्थिती होती.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

 

 

 

 

 

 

loading image