esakal | पालकमंत्री बच्चू कडू यांना पुन्हा कोरोना झाला कसा?
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Corona News Guardian Minister Bachchu Kadu again Corona positive

जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू हे त्यांच्या मतदारसंघामध्ये सातत्याने फिरत असतात. तसेच जनतेसोबत थेट संवाद साधत असतात. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामधून ते बरे देखील झाले होते.

पालकमंत्री बच्चू कडू यांना पुन्हा कोरोना झाला कसा?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू हे त्यांच्या मतदारसंघामध्ये सातत्याने फिरत असतात. तसेच जनतेसोबत थेट संवाद साधत असतात. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामधून ते बरे देखील झाले होते.

मात्र, आता दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये ते सहभागी झाले होते. तसेच त्यासाठी त्यांनी बाईकवरून अमरावती ते दिल्ली असा प्रवास केला होता. दिल्लीवरून परतल्यानंतर ते त्यांच्या मतदारसंघात फिरून आढावा घेत होते. तसेच अकोल्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देखील त्यांच्यावर आहे.

हेही वाचा -  Lockdown Breaking: रविवारी राहणार संपूर्ण लॉकडाउन…!

राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असून ते सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांनी स्वतःची चाचणी करावी व काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. याबाबत ट्विट करून त्यांनी माहिती दिली. 

हेही वाचा - धक्कादायक; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आणखी २७ विद्यार्थी पॉझिटिव्ह

दरम्यान, अकोला आणि अमरावती या दोन्ही जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण प्रचंड वाढत असून बच्चू कडू स्वतः त्याचा आढावा घेत आहेत. त्यामुळेच त्यांना कोरोनाची लागण झाली असावी, असेही म्हटले जात आहे.

हेही वाचा - धोका वाढला; रविवारी संपूर्ण दिवसभर तर दररोज रात्रीची संचारबंदी

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांचेही अनेक ठिकाणी संवाद यात्रा आणि दौरे होते. तसेच गुरुवारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली. 

अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

भिती वाढतेय; पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ९० नव्या रुग्णांची भर

तुम्हाला उद्योग करायचा आहे का? मिळणार आर्थिक बळ आणि ट्रेनिंगही

बस थांबली, महामार्ग ठप्प!, दहा किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा

राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू

loading image