esakal | कोरोनामुळे एकाचा मृत्यू; ९१२ ॲक्टिव्ह रूग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Corona News One dies due to corona; 912 active patients

 कोरोनामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने रविवारी (ता. १४) एका रूग्णाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. सदर रुग्ण तापडीया नगर, अकोला येथील ८५ वर्षीय पुरूष होते. त्यांना ८ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते. याव्यतिरीक्त जिल्ह्यात ९८ नवे रूग्ण आढळले.

कोरोनामुळे एकाचा मृत्यू; ९१२ ॲक्टिव्ह रूग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : कोरोनामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने रविवारी (ता. १४) एका रूग्णाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. सदर रुग्ण तापडीया नगर, अकोला येथील ८५ वर्षीय पुरूष होते. त्यांना ८ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते. याव्यतिरीक्त जिल्ह्यात ९८ नवे रूग्ण आढळले.

त्यामुळे जिल्ह्यातील एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ९१२ झाली आहे. कोरोना ग्रस्तांचा आकडा गत पाच-सात दिवसांपासून वाढत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांसाठी धोक्याची घंटा वाढत आहे.

हेही वाचा - राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू

कोरोना संसर्ग तपासणीचे रविवारी (ता. १४) जिल्ह्यात २८४ अहवाल प्राप्त झाले. त्यामधून १८४ अहवाल निगेटिव्ह तर ९८ अहवाल पॉझिटिव्ह आले. सकाळी ९१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात २८ महिला व ६३ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तापडीया नगर, डाबकी रोड व शिवणी येथील प्रत्येकी चार, चतुर्भुज कॉलनी, कारंजा राम ता. बाळापूर, विद्या नगर, जठारपेठ, मोठी उमरी व तेल्हारा येथील प्रत्येकी तीन, वानखड नगर, गोरक्षण रोड, पातूर, खानापूर ता. पातूर, गोकुळ कॉलनी, कैलाश टेकडी, मलकापूर, जवाहर नगर, शास्त्री नगर, गिता नगर, ज्योती नगर, जीएमसी, गोडबोले प्लॉट येथील दोन तर उर्वरित खेडकर नगर, खडकी, मनारखेड, हिंगणा फाटा, कलेक्टर ऑॅफीस, बोरगाव मंजू, ज्योती नगर, रणपिसे नगर, न्यू राधाकिसन प्लॉट, चोहट्टा बाजार, नंदिपेठ, संत नगर, गुलशन कॉलनी, पास्टूल, निंभोरा, आाळसी प्लॉट, शिवणी, दहीहांडा, न्यू तापडीया नगर, राम नगर, श्रीकृष्ण नगर, अंबिकापूर, वृंदावन नगर, म्हाडा कॉलनी, गणेश नगर, कौलखेड, लहान उमरी, तुकाराम चौक, लकडगंज, रामदासपेठ, अनिकेत चौक, रेल्वे कॉलनी, पिंजर, वाशिम रोड व त्र्यंबक नगर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवाशी आहे. सायंकाळी सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात दोन महिला व पाच पुरुषांचा समावेश असून ते कौलखेड, राऊतवाडी, विद्या नगर, बाळापूर, अमानखां प्लॉट, बार्शीटाकळी व अकोट येथील रहिवाशी आहे.

हेही वाचा - जिल्हा बँक निवडणुक; मतदार अज्ञातस्थळी; उमेदवारीचा गुंता कायम

४८ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून रविवारी (ता. १४) १२, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, बिहाडे हॉस्पिलटल येथून तीन, स्कायलार्क हॉटेल येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून एक, तर होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले २८ अशा एकूण ४८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

हेही वाचा -  अकोल्यात प्रथमच शॉर्ट फिल्म फेस्टिवल स्पर्धा

कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - १२३९५
- मृत - ३४३
- डिस्चार्ज - १११४०
- ॲक्टिव्ह रूग्ण - ९१२

 

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

हेही वाचा -  

भिती वाढतेय; पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ९० नव्या रुग्णांची भर

तुम्हाला उद्योग करायचा आहे का? मिळणार आर्थिक बळ आणि ट्रेनिंगही

बस थांबली, महामार्ग ठप्प!, दहा किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा

 

loading image