अकोट-अकोला मार्गाने सोसाव्या लागतात मरणयातना!

Akola Marathi News Akot-Akola route has to suffer death!
Akola Marathi News Akot-Akola route has to suffer death!

अकोट (जि.अकोला)  : गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यातील बहुतांश प्रमुख मार्गांवर खड्ड्यांचे साम्राज्य अद्यापही टिकून आहे. या खड्ड्यांमुळे अनेकांना प्राणास मुकावे लागले तर काहींना अपंगत्व आले. मात्र प्रशासनातर्फे केवळ थातुरमातुर खड्डे बुजविण्यात येत असल्याने काही दिवसातच परिस्थिती जैसे थे होवून खड्ड्यांचे साम्राज्य अधिक बळकट होत चालले आहे.

अकोला मार्गांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. या मार्गाने प्रवास करतांना प्रत्येक प्रवाशी व वाहनचालकांना मरणयाना सोसाव्या लागत आहे. त्यातच या मार्गाने दररोज प्रवासी सर्वच वाहने देखील खिळखिळी झाली आहे.

अकोलानंतर जिल्ह्यातील सर्वदृष्टीने नावाजलेला व सर्वाधिक महसूल देणारा अकोट तालुका विकासाच्या दृष्टीने तितकाच मागे पडलेला आहे. या तालुक्यात सर्वच राजकीय पदाधिकारी व विविध संघटना सक्रीय आहेत. अकोट तालुक्यात नागरिकांना अपेक्षित असणाऱ्या मुलभूत सोयीसुविधा केवळ कागदावरच पुरवल्या जात असल्याचा आरोप होत आहे.

तालुक्यातील प्रमुख मार्गांसह इतरही मार्गांवर अनेक वर्षांपासून खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. या जीवघेण्या खड्ड्यांमुळे व्यापाऱ्यांसह शेतकरी व दररोज ये-जा करणारे वाहनधारक कमालीचे वैतागले आहेत. खड्ड्यांमुळे अपघात घडून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. तर कित्येकजण गंभीर जखमी झाले आहेत.

केवळ देवरी फाटा ते शेगाव व अंजनगाव मार्गाचे नसीब पालटले असून, या मार्गाने सुखकर प्रवास होतो.त्या उलट अकोट अकोला मार्गावर विस्तारीकरणाच्या नावाने खोदुन ठेवला आहे. नियोजन शून्य कारभारामुळे चार वर्षांपासून हा मार्ग अजुनही पूर्ण झालेला नाही. अकोट ते देवरी फाटा, चोहोटापर्यंत रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले आहेत.

त्यातच धुळीचे लोट व दगड उसळत असल्याने सतत अपघाताची मालीका सुरूच आहे. केवळ ४५ किलोमीटरच्या अंतारासाठी चार वर्षाचा कालावधी लोटला तरी काम तर झाले नाहीच उलट नागरिकांना मरणयातना सोसाव्या लागत आहे.

एक ते दीड वर्षाच्या कालावधीत झालेला ढगा फाटा ते हीवरखेड मार्गाचेही बऱ्याच ठिकाणी पितळ उघडे पडल्याचे दिसून येते. वास्तविक पाहता या मार्गांवर अनेकदा पाण्यासारखा पैसा खर्च करूनही कामाची मर्यादा तीन वर्षापेक्षा अधिक टिकत नाही. हे मार्ग तर जणू मृत्यूचे सापळेच बनलेले आहेत. अनेक राजकीय पक्ष व विविध संघटनांनी आंदोलने करुनही निगरगट्टांना काहीही देणेघेणे नसल्यासारखी परिस्थीती आहे.

हेही वाचा -  लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या विद्यार्थ्याने लढविली ग्रामपंचायतची निवडणूक, निकाल तर पहा

सखोल चौकशीची मागणी
गत ३ ते ४ वर्षाच्या कालावधीत अकोट तालुक्यातील अंतर्गत व मुख्य मार्गाची डागडूजी व नवीन तयार करण्यात आलेल्या कामाची सखोल चौकशी झाल्यास सत्य समोर येण्यास वेळ लागणार नाही.

हेही वाचा - शेतात गव्हाच्या पिकाची जागल करण्याकरिता गेले अन् अचानक केला बिबट्याने हल्ला

पदाधिकाऱ्यांना दाखवावा घरचा रस्ता
मतदारांनी आपल्याला होणाऱ्या प्रचंड यातनाची जान ठेवून येणाऱ्या निवडणुकीत निष्क्रीय पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्याची मानसिकता तयार करण्याची गरज आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

हेही वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com