इंधनावरील कर कमी करण्याची राज्य सरकारची इच्छाशक्ती नाही

Akola Marathi News - BJP spokesperson Shivrai Kulkarni accused; Let's follow up to eliminate the backlog of West Vidarbha
Akola Marathi News - BJP spokesperson Shivrai Kulkarni accused; Let's follow up to eliminate the backlog of West Vidarbha

अकोला :  केंद्र सरकारने अर्थसंकल्पात कधी नव्हे ती यावेळी भरीव तरतुद केली आहे. महाराष्ट्रातील प्रकल्पांसाठी भरपूर निधी दिला आहे. इंधनावर लावलेले कर हे अपिहार्य होते. राज्य सरकारने इंधनावर लावलेले कर कमी केले तर निश्चित दर कमी होतील. मात्र राज्य सरकारची इच्छाशक्ती नसल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केला आहे.


केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून ‘महाराष्ट्राला काय मिळाले?’ यासंदर्भात रविवारी (ता. १४) अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवराय कुळकर्णी यांनी केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदीत वाढ झाल्याचा दावा केला. सन २००९ ते २०१४ हा युपीए सरकारचा काळ. त्यात महाराष्ट्राला सरासरी वार्षिक तरतुद ११७१ कोटी रुपये होती.

केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर २०१४ ते २०१९ या काळात ३१० टक्के अधिक म्हणजे ४८०१ कोटी रुपये तरतुद करण्यात आली असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाला आहे. त्यासाठी काही कठोर निर्णय सरकारला घ्यावे लागले. मात्र ते करत असताना कोरोनासारख्या संकट काळात नागरिकांच्या जिविताला प्राधान्य देण्यात आले. अर्थव्यवस्थेला फटका बसणार याची जाणीव असतानाही कठोर निर्णय घेतल्याचे कुळकर्णी यांनी सांगितले.

हेही वाचा -  जिल्हा बँक निवडणुक; मतदार अज्ञातस्थळी; उमेदवारीचा गुंता कायम

विदर्भातील प्रकल्पांसाठी मोठा निधी
विदर्भातील मेट्रो, नवीन रेल्वे लाईन, सिंचन प्रकल्प, रस्ते प्रकल्पांसाठी मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे. अकोला-रतलाम या रेल्वे मार्गाच्या गेज परिवर्तनासाठी २५० कोटी रुपयांची तरतुद केली आहे. वर्धा-नांदेड रेल्वे मार्गासाठीही निधी दिल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - अकोल्यात प्रथमच शॉर्ट फिल्म फेस्टिवल स्पर्धा

पश्चिम विदर्भाच्या अनुशेषाकडे वेधले लक्ष
पूर्व विदर्भाच्या तुलनेत पश्चिम विदर्भातील सिंचन, रेल्वे, रस्ते प्रकल्पांसाठी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात फारशी तरतुद नाही. याकडे भाजप प्रवक्त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी पश्चिम विदर्भातील अनुशेषाबाबत खंत व्यक्त करीत याबाबत पक्ष श्रेष्ठींकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

हेही वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com