
८४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत अकोट तालुक्यातील १० गावांमध्ये नवीन पाईप टाकण्यायेवजी जुनीच पाईप लाईन टाकण्यात आली. त्यामुळे या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन समितीच्या सभेत गाजला.
अकोला: ८४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत अकोट तालुक्यातील १० गावांमध्ये नवीन पाईप टाकण्यायेवजी जुनीच पाईप लाईन टाकण्यात आली. त्यामुळे या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन समितीच्या सभेत गाजला.
त्यामुळे या प्रकरणाची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मार्फत चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभा भोजने यांनी दिले.
हेही वाचा - आता सरपंच होणार कोण, कसे असेल ग्रामपंचायतचे आरक्षण?
जिल्हा परिषदेच्या राजश्री छत्रपती शाहू महाराज सभागृहात गुरुवारी (ता. २१) जल व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली. सभेत अकोट तालुक्यात ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत २०१५-१६मध्ये करण्यात आलेल्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ यांनी उपस्थित केला.
हेही वाचा - अनाथ अनुराधाचे सुख नियतिलाही पहावले नाही!
गावांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी लोखंडी पाईप लाईन टाकण्याचे कंत्राट ठेकेदाराला देण्यात आले होते, परंतु ठेकेदाराने १० गावांमध्ये लोखंडी पाईप लाईन टाकली नाही. त्यासोबतच काही गावांमध्ये पीव्हीसी पाईप लाईन टाकली,
तर काहींमध्ये जुनीच पाईप लाईन राहू दिली. त्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंंचाईचा समाना करावा लागत आहे. १० कोटी २० लाख रुपये खर्च करुन सदर काम मजीप्राच्या देखरेखी खाली करण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचा मुद्दा सभेत कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ यांनी सभेत लावून धरला.
हेही वाचा - लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या विद्यार्थ्याने लढविली ग्रामपंचायतची निवडणूक, निकाल तर पहा
कंत्राटदार व तत्कालीन अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांना पाणी मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणाची मजीप्राच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात यावी, असे आदेश सभेत अध्यक्ष प्रतीभा भोजने यांनी सभेत दिले.
हेही वाचा - शेतात गव्हाच्या पिकाची जागल करण्याकरिता गेले अन् अचानक केला बिबट्याने हल्ला
सभेत शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरूजी, महिला व बाल कल्याण सभापती मनीषा बोर्डे, समाज कल्याण सभापती आकाश सिरसाट, जिल्हा परिषदेचे सदस्य, अधिकारी यांची उपस्थिती होती.
(संपादन - विवेक मेतकर)
हेही वाचा -