esakal | शेतकऱ्यांचे दिल्लीकडे कूच,  आंदोलनात होणार सहभागी
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News Farmers march to Delhi, will participate in the agitation

 केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यविरोधात दिल्लीच्या सीमेवर पंजाब व हरियाणा राज्यातील शेतकरी आंदोलन करत आहेत. सदर आंदोलनात सहभागी होण्यासाठी अकोल्यातून किसान सभा व भाकपच्या नेतृत्वात कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी रविवारी (ता. ३) सकाळी १० वाजता दिल्लीकडे कूच केली. स्थानिक शिवर येथून शेतकऱ्यांचा जत्था नागपूरकडे रवाना झाला. जत्थ्यांमध्ये सहभागी कार्यकर्ते व शेतकरी नागपूर येथून दिल्लीकडे प्रयाण करतील.

शेतकऱ्यांचे दिल्लीकडे कूच,  आंदोलनात होणार सहभागी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यविरोधात दिल्लीच्या सीमेवर पंजाब व हरियाणा राज्यातील शेतकरी आंदोलन करत आहेत. सदर आंदोलनात सहभागी होण्यासाठी अकोल्यातून किसान सभा व भाकपच्या नेतृत्वात कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी रविवारी (ता. ३) सकाळी १० वाजता दिल्लीकडे कूच केली. स्थानिक शिवर येथून शेतकऱ्यांचा जत्था नागपूरकडे रवाना झाला. जत्थ्यांमध्ये सहभागी कार्यकर्ते व शेतकरी नागपूर येथून दिल्लीकडे प्रयाण करतील.

केंद्रातील मोदी सरकारने पावसाळी अधिवेधनात तीन कृषी विधेयकं पारित केले. सदर विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आरोप शेतकरी व शेतकरी संघटना करत आहेत. त्यामुळे सध्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब आणि परिसरातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करत पंजाब, हरियाणासह इतर राज्यातील शेतकरी गत ३७ दिवासंपासून दिल्ली व दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत.

शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक आक्रमक होत असतानाच त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अकोल्यातून शेतकरी व भाकप-किसान सभेचे कार्यकर्ते नागपूरमार्गे दिल्ली कडे रवाना झाले आहेत. सदर जत्थ्याचे नेतृत्व किसान सभा, भाकप, आयटकचे राज्य काउंसिल सदस्य कॉ. नयन गायकवाड करत आहेत. जत्थ्यात कॉ. प्रकाश रेड्डी, राजू देसले, मधुकर पाटील, दुर्गा देशमुख, माधुरी परणाटे, प्रतिभा यादव, दंदे बाई, अनंत सिरसाट, ऑल इंडिया स्टूडंट फेडरेशनचे विराज देवांग यांचा समावेश आहे.

परजिल्ह्यातूल आलेल्यांचे स्वागत
शिवर येथून अकोल्यातील जत्थ रवाना होत असताना त्याठिकाणी मुंबई, नाशीक व जळगाव येथून आलेल्या शेतकरी व भाकप, किसान सभेचे कार्यकर्ता, नेत्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भाकपचे सचिव रमेश गायकवाड यांची संबंधितांचे स्वागत केले व जत्थ्याला हिरवी झंडी दाखवून रवाना केले. प्रवासात जत्थ्याचे मूर्तिजापूर, बडनेरा, अमरावती येथे स्वागत करण्यात आले.

अमरावती, नागपूर येथे सभा
अकोला व इतर जिल्ह्यातून दिल्लीकडे रवाना झालेल्या जत्थ्यातील कार्यकर्ता, शेतकऱ्यांनी अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे रविवारी दुपारी आयोजित सभेत सहभाग घेतला. त्यानंतर जत्था नागपूरकडे रवाना झाला. नागपूर येथे रविवारी आयोजित सभेत अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय महासचिव अतुल कुमार अंजान यांची जाहीर सभा झाल्यानंतर संबंधित दिल्लीकडे कूच करतील, अशी माहिती नयन गायकवाड यांनी दिली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

 

हेही वाचा -

पहिल्या टप्प्यात सात हजार फ्रंटलाईन वर्करला मिळणार कोरोनाची लस!

उद्‍ध्वस्त खरीपावर सरकारी माेहाेर; शेतकऱ्यांना मिळणार सवलती

शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजना एकाच अर्जाद्वारे, महाडीबीटी पोर्टल योजनेचा लाभ घ्या!

तुम्हाला गौळण, अभंग, पोवाडा, भारूड येतयं तर करा अर्ज, मुदत आहे २१ जानेवारीची