चोरांची नव्या ठाणेदाराला सलामी; एकाच रात्री चार घरफोड्या

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 23 January 2021

बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाढत्या गुन्हेगारी घटनाकंडे बघता कुठेतरी पोलिस प्रशासन त्यावर अंकुश लावण्यात अपयशी झाल्याचेच दिसून येते. गेल्या काही दिवसापासून घरफोडीच्या घटना वाढू लागल्या आहेत.

बाळापूर (जि.अकोला) : बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाढत्या गुन्हेगारी घटनाकंडे बघता कुठेतरी पोलिस प्रशासन त्यावर अंकुश लावण्यात अपयशी झाल्याचेच दिसून येते. गेल्या काही दिवसापासून घरफोडीच्या घटना वाढू लागल्या आहेत.

शुक्रवारी बाळापूर शहरात चार घरफोडीच्या घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
बडा मोमीनपूरा भागातील भरवस्तीत अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

हेही वाचा -कसा होणार विकास? रस्त्याच्या कामामध्ये होतोय मुरूम ऐवजी चक्क मातीचा वापर

घरी कोणी नसल्याची संधी साधत काल गुरुवारी मध्यरात्रीनंतर घरफोड्या झाल्या. चोरट्यांनी घरांच्या दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश करीत सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच इतर मौल्यवान वस्तू असा लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

हेही वाचा -पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याची तयारी, शिक्षक, कर्मचाऱ्यांची होणार कोरोना चाचणी

बडा मोमीनपूरा येथील रजनी बेलोकार हि महीला आपल्या दहा वर्षीय मुलासह राहते. अकरा महीण्यांपुर्वी तिच्या पतीचा मृत्यू झाल्याने ती एकटीच राहत होती. काल ती नांदेड येथे आपल्या नातेवाईकांकडे गेली होती. याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. व कपाटातील सर्व मौल्यवान दागीने व रोख दोन लाख रुपये असा सहा ते सात लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला असल्याचे रजनी बेलोकार यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याची तयारी, शिक्षक, कर्मचाऱ्यांची होणार कोरोना चाचणी

घटनेची माहिती मिळताच रजनी बेलोकार नांदेडहून बाळापूर येथे आल्यावर मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्याचे लक्षात आले. तर याच भागातील ईतर तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या. मात्र याठिकाणी चोरट्यांना रिकाम्या हाती परतावे लागले.

हेही वाचा -आता सरपंच होणार कोण, कसे असेल ग्रामपंचायतचे आरक्षण?

चोरटे शहरातील असल्याचा संशय
गेल्या काही दिवसापासून बाळापूर पोलिसांच्या हद्दीत घरफोडीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. ठाणेदार नितीन शिंदे यांची बदली होताच दत्तात्रय आव्हाळे नवे ठाणेदार रुजु झाले.नवे ठाणेदार रुजु झाल्यानंतर शहरात "आम्ही सक्रीय असल्याची" सलामीच चोरांनी दिली आहे.

हेही वाचा -सीरम इन्स्टिट्यूट मधील आगीत अकोल्याच्या युवकाचा मृत्यू

ठाणेदार आव्हाळे व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. तर ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. पोलिसांनी शासकीय सोपस्कार पार पाडले. यावेळी ठाणेदार आव्हाळे यांनी चोरटे शहरातीलच असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

 

हेही वाचा -


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News Four burglary cases in one night in Balapur city