
भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी जी.श्रीकांत यांनी बुधवार, ता. १७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या अकोला येथील मुख्य कार्यालयात रुजू होवून व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला.
अकोला : भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी जी.श्रीकांत यांनी बुधवार, ता. १७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या अकोला येथील मुख्य कार्यालयात रुजू होवून व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला.
महाबीजमध्ये रुजू होण्यापूर्वी जी.श्रीकांत हे लातूर येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी ते अकोला येथे सन २०१५ ते २०१७ पर्यंत जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. शासनाने त्यांची बदली महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालक या पदावर केल्यामुळे अकोला शहरातील त्यांची दुसऱ्यांदा पदस्थापना होय, हे विशेष.
हेही वाचा - शेतकऱ्यांच्या विश्वासाचं बियाणं करतंय दरवर्षी सहाशे कोटींची उलाढाल, महाबीजचा असा चालतो कारभार
रुजू झाल्या झाल्या त्यांनी विभाग प्रमुखांसमवेत कामकाजाचा आढावा घेवून आगामी खरीप हंगाम यशस्वीते करिता नियोजनाचे दृष्टीने आवश्यक ते निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी महाव्यवस्थापक डॉ.लहाने (प्रशासन), महाव्यवस्थापक श्री.कुचे (विपणन), महाव्यवस्थापक श्री.यादव (वित्त), श्री.शेख व प्रबोध धांदे आदी उपस्थित होते.
अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा
संपादन - विवेक मेतकर
अधिक वाचा -
भिती वाढतेय; पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ९० नव्या रुग्णांची भर
तुम्हाला उद्योग करायचा आहे का? मिळणार आर्थिक बळ आणि ट्रेनिंगही
बस थांबली, महामार्ग ठप्प!, दहा किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा
राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू