Gram Panchayat Result :आता सरपंच पदासाठी चुरस, कुठे संमिश्र तर कुठे संपूर्ण पॅनलचा दबदबा

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 19 January 2021

 जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता. १५) मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर सोमवारी (ता. १८) सर्वच तालुक्यांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. निवडणुकीत ४ हजार ४११ उमेदवार रिंगणात होते. त्यामधून १ हजार ७४१ सदस्यांची मतदारांनी निवड केली. ७३८ प्रभागांसाठी सदर निवडीची प्रक्रिया पार पडली.

अकोला  : जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता. १५) मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर सोमवारी (ता. १८) सर्वच तालुक्यांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. निवडणुकीत ४ हजार ४११ उमेदवार रिंगणात होते. त्यामधून १ हजार ७४१ सदस्यांची मतदारांनी निवड केली. ७३८ प्रभागांसाठी सदर निवडीची प्रक्रिया पार पडली.

मतमोजणीनंतर काही ग्रामपंचायतींमध्ये एका पॅनलचे बहुतांश सदस्य निवडून आले, तर काहींमध्ये मतदारांनी संमिश्र कौल दिला. त्यामुळे आता ग्रामपंचायतींमध्ये सत्तास्थापनेसाठी राजकीय चढाओढ पाहायला मिळत आहे.

हेही वाचा - कोरोना लसीकरणानंतर दोन महिलांना आली रिॲक्शन!

या निवडणुकीत नवीन निर्णयानुसार, सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम तसेच सरपंच आणि उपसरपंच यांची निवड मतदानानंतर ३० दिवसांच्या आत राबविण्यात येणार असल्याने आता ग्रामीण भागात सरपंच पदाच्या निवडीची उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा - आमदार अमोल मिटकरी यांच्या गावात ग्रामस्वराज्य पॅनलचा उधळला गुलाल

राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींपैकी २२५ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित केला होता. त्यापैकी सदोष प्रभाग रचनेमुळे बाळापूर तालुक्यातील व्याळा ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात आला, तर उर्वरित २२४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. निवडणूक प्रक्रियेअंतर्गत १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. परिणामी जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायतींसाठी मतदानाची प्रक्रिया शुक्रवारी (ता. १५) सातही तालुक्यांमध्ये पार पडली.

हेही वाचा - धक्कादायक! मतमोजणी सुरू असतानाच सख्ख्या चुलत भावाने केला चाकू हल्ला

या ग्रामपंचायतींमध्ये ४ हजार ४११ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये सर्वाधिक महिला उमेदवारांचा समावेश होता. दरम्यान मतदानानंतर सोमवारी (ता. १८) संंबंधित तालुक्यात तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. मतमोजणीमध्ये मतदारांनी काही ग्रामपंचायतींमध्ये संपूर्ण पॅनल निवडून दिले तर काहींमध्ये संमिश्र कौल दिला. त्यामुळे मतमोजणीनंतर आता सरपंच पदाच्या निवडीवर ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा - शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांच्या मुळ गावी मदाणी ग्रामपंचायतवर फडकविला झेंडा

ईश्वर चिठ्ठीने निवड
- अकोला तालुक्यातील आपोती बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये मतमोजणीदरम्यान काट्‍याची टक्कर पाहायला मिळाली. अनुसूचित जमातीसाठी (स्री) राखीव या प्रवर्गातील महिला उमेदवार शिलाबाई रामागरे व वंदना शिवानंद तराळे यांना प्रत्येकी ७१-७१ मतं मिळाली. त्यामुळे विजयी उमेदवारांची निवड करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ईश्वर चिठ्‍ठी काढली. त्यामध्ये वंदना तराळे यांच्या नावाची चिठ्‍ठी निघाली.

हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बात्यांसाठी क्लिक करा

त्यामुळे या प्रभागातून वंदना तराळे यांना विजयी घोषित करण्यात आले. तेल्हारा तालुक्यातील अटकळी ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड क्रमांक १मध्ये राजेश रमेश दारोकार व सुरेश अशोक सावदेकर यांना सारखी ११५-११५ मते मिळाली होती. त्यामधून ईश्वर चिठ्ठीने सावदेकर विजयी झाले.

(संपादन - विवेक मेतकर)

हेही वाचा - 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News Now for the post of Sarpanch, where is the composite, where is the dominance of the entire panel