हरभऱ्याचा पेरा शंभर टक्क्याहून अधिक, उत्पादन मात्र निम्म्यावर

Akola Marathi News Sowing of gram is more than one hundred percent, but production is only half
Akola Marathi News Sowing of gram is more than one hundred percent, but production is only half

अकोला : पावसाचा लहरीपणा, अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाचा फटका बसून यंदा अख्खा खरीप नुकसानात गेला. जमिनीला ओल चांगली असल्याने रब्बीत मात्र लाभ होईल अशी अपेक्षा करून शेतकऱ्यांनी सरासरी क्षेत्रापेक्षाही अधिक म्हणजे १०४ टक्के हरभऱ्याची पेरणी केली. परंतु, हवामानाचा आणि बुरशीजन्य रोगाचा फटका बसून हरभऱ्याचे उत्पादनही निम्म्यावर आले आहे. गव्हाच्या पिकावरही वादळी पावसाचे संकट आहेच. त्यामुळे खरिपाप्रमाणे रब्बीतही शेतकऱ्यांचे नशीब फुटकेच राहणार की काय, असे चिन्ह दिसत आहेत.

हेही वाचा - राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू

मॉन्सून उशिरा आल्याने खरीप २०२० ची सुरुवातच उशिरा झाली. त्यामुळे पेरणी आणि पर्यायाने हंगामही लांबला. त्यातही सुरुवातीला पेरणीनंतर पावसाने दीर्घ दांडी मारली व नंतर सततधार पाऊस सुरू राहल्याने ज्वारी, मूग, उडिदाचे सर्व पीक उद्ध्वस्त झाले. सोयाबीनचे उत्पादनही निम्म्याहून कमी झाले तर, कपाशीलाही अतिवृष्टी आणि गुलाबी बोंडअळीचा चांगलाच फटका बसून, जवळपास ५० टक्के उत्पादन घट झाली.

खरिपातील तुरीपासून शेतकऱ्यांना चांगली अपेक्षा होती. परंतु, मध्यंतरी दव पडल्याने व वातावरणात वेळोवेळी बदल झाल्याने तुरीचे उत्पादनही घटले. त्यामुळे जवळपास अख्खा खरपीच शेतकऱ्यांच्या हातून गेला मात्र, अतिवृष्टीमुळे जमिनीला ओल असल्याचा फायदा रब्बीतील पिकांना नक्कीच होईल व त्यामुळे रब्बीचे पीक उत्पादनही भरघोस होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. त्यानुसार जिल्ह्यात हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र ९० हजार ७ हेक्टर असूनही ९३ हजार ५१४ हेक्टरवर शेतकऱ्यांनी हरभऱ्याची लागवड केली. ओल चांगली असल्याने पीकही बहरले मात्र, अचानक थंडी विरल्याने व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन जवळपास २० टक्के पिकात मर झाली आणि गाठे भरण्याआधीच पीक सोकल्याने उत्पादनात जवळपास निम्म्यापेक्षा जास्त घट दिसून येत आहे.

हरभऱ्याच्या दाण्याचा आकारही लहान राहाल्याने उत्पादनाला अपेक्षित भाव मिळेल की, नाही याचीही शाश्‍वती शेतकऱ्यांना राहाली नाही. जिल्ह्यात एकूण रब्बी पेरणी एक लाख १३ हजार ७७८ हेक्टरवर करण्यात आली असून, त्यापैकी ८२ टक्के केवळ हरभऱ्याची असून, हरभऱ्याचे उत्पादन जवळपास निम्म्याहून कमी झाल्याने रब्बी सुद्धा नुकसानात गेल्याचे चित्र आहे.

गहू उत्पादकांची आशा कायम
ओलिताची सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांनी सरासरी क्षेत्राच्या तुलनेत ११३ टक्के म्हणजे १९ हजार ४५० हेक्टरवर गव्हाची पेरणी केली आहे. यावर्षी मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने गव्हाचे पीक सध्या जोमदार आहे. त्यामुळे हरभऱ्याचे उत्पादन घटले असले तरी, गहू उत्पादकांची भरघोस उत्पादनाची आशा कायम आहे.

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

हेही वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com