रस्त्यांवर चालताही येत नव्हते, नवीन आयुक्तांची शहरातील पहिली कारवाई

Akola Municipal News Encroachment JCB Action Commissioner Neema Arora
Akola Municipal News Encroachment JCB Action Commissioner Neema Arora

अकोला :  कोरोना संकट काळात महानगरपालिकेचा कारभार ढेपाळला होता. त्यामुळे अकोला शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांना अतिक्रमणाचा विळखा बसला. या अतिक्रमणावर तब्बील वर्षभरानंतर महानगरपालिकेचा जेसीबी चालला. नवीन आयुक्त नीमा अरोरा यांच्या उपस्थितीत तब्बल पाच तास अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली.


अकोला शहरातील टिळक रोड व गांधी रोड हे बाजारपेठेतील दोन मुख्य रस्ते. या रस्त्यांवर हातगाड्यांवर व्यवसाय करणाऱ्यांसोबतच लघु व्यवसायीकांनी अतिक्रमण केले होते. मार्च २०२० मध्ये लॉकडाउन लागल्यानंतर मोकळे झालेले रस्ते अनलॉकनंतर पुन्हा अतिक्रमणाचा विळख्यात सापडले. रस्त्यावरून गाडी चालवणे तर सोडाच पण पायीसुद्धा नीट चालता येत नव्हते अशी परिस्थिती झाली होती.

हेही वाचा - Corona Update : पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी

अखेर नवीन आयुक्त नीमा अरोरा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथमच बाजारपेठेतील रस्त्ये मोकळे करण्याची कारवाई हाती घेतली. व्यावसायिकांसाठी आधी भाटे क्लब व खुले नाट्यगृहाजवळील जागा आखून दिली. तेथे व्यवसाय करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्यात. त्यासाठी सोमवारपर्यंत वेळ दिली होती. मात्र रस्‍त्यावरच व्यवसाय करण्याचा आग्रह असलेल्या व्यावसायिकांनी नवीन अधिकारी आले की कारवाई होतेच, दोन-तीन दिवसात पुन्हा जैसे-थे असा समज करून घेत आखून दिलेल्या जागेवर जाण्यास नकार दिला. त्यामुळे सोमवारी सकाळी १०.१५ वाजतापासून खुले नाट्यगृहापासून अतिक्रमण निर्मुलनाला सुरवात झाली. फतेह चौक, दीपक चौक, अकोट स्टँँड, टिळक रोड, सिटी कोतवाली चौक, गांधी रोडमार्गे खुले नाट्यगृहाजवळ दुपारी ३.३० वाजता कारवाई थांबविण्यात आली.

हेही वाचा - शेतकरी नेते राकेश टीकैत शनिवारी अकोल्यात, संयुक्त किसान मोर्चा फुंकणार आंदोलनाचे बिगुल

अतिक्रमकांकडून विरोध
मनपा पथकाकडून कारवाई सुरू असताना दीपक चौकाच्या पुढे रेड क्रॉस सोसायटीजवळ काही अतिक्रमकांनी पथकाला विरोध केला. यावेळी शाब्दीक वादही झाला. मात्र सिटी कोतवाली पोलिसांच्या बंदोबस्त्यात अतिक्रमकांचा विरोध मोडून काढत रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले.

हेही वाचा - रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा लॉकडाऊन ?

पुन्हा जैस-थेची भिती
अकोला शहरातील रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांनी मनपाचे पथक निघून गेल्यानंतर पुन्हा खुले नाट्यगृह ते फतेह चौकापर्यंत फळशाच्या गाड्या रस्त्यावर लावून मनपाच्या कारवाईला वाकुल्या दाखविल्या. ते बघता मनपाने अतिक्रमणाविरुद्ध कारवाई केली असली तरी पुन्हा जैसे-थेची भिती कायम आहे. त्यामुळे कायम स्वरुपी उपाययोजनांवर मनपा आयुक्त भर देतील अशी अपेक्षा आहे.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

भिती वाढतेय; पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ९० नव्या रुग्णांची भर

तुम्हाला उद्योग करायचा आहे का? मिळणार आर्थिक बळ आणि ट्रेनिंगही

बस थांबली, महामार्ग ठप्प!, दहा किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा

राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com