
जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी तसेच फ्रन्टलाईनवर काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. केन्द्र शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात दुसरा टप्प्या सुरू करण्यात आला असून यात ६० वर्षावरील वयोवृद्ध व ४५ वरील वयोगटातील दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.
अकोला : जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी तसेच फ्रन्टलाईनवर काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. केन्द्र शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात दुसरा टप्प्या सुरू करण्यात आला असून यात ६० वर्षावरील वयोवृद्ध व ४५ वरील वयोगटातील दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील शासकीय कोविड लसीकरण केंद्रावर लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. याबाबतची खाजगी लसीकरण केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत नियोजन भवनात आयोजित करण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा शल्य चिकीत्सक तथा प्रभारी उपसंचालक आरोग्य डॉ. राजकुमार चव्हान, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, डॉ. अश्वीनी खडसे, डॉ. अनुप चौधरी आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयातून लसीकरण बुधवार ( ता. ३) पासून करण्यात येणार आहे.
------------
६०४ जणांचे लसीकरण
शासकीय लसीकरण केंद्रांवर ६०४ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. यात ६० वर्षावरील ४०६ वयोवृद्धाचा तर ४५ ते ५९ वयातील दुर्धर आजार असणाऱ्या ३४ व्यक्तींचा आणि १६१ इतर व्यक्तींचा समावेश आहे.
----------
या रूग्णालयांचा समावेश
संत तुकाराम हॉस्पीटल, सिटी हॉस्पीटल, माऊली मॅटरनिटी व सर्जिकल हॉस्पीटल, डॉ. के.एस. पाटील हॉस्पीटल ॲन्ड पॉलिक्लिनिक हॉस्पीटल, श्रीमती बी.एल. चांडक रिसर्ज फाऊंडेशन(वसंती हॉस्पीटल) आणि शुक्ला मल्टीस्पेशलीटी हॉस्पीटल या रूग्णालयांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येईल.
अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा संपादन - विवेक मेतकर
|
|||