माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे यांचे हृदविकाराने निधन, काही दिवसांपूर्वीच केली होती कोरोनावर मात

मनोज भिवगडे
Tuesday, 27 October 2020

भारतीय जनता पक्षाचे आणि माळी समाजाचे वरिष्ठ नेते माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे यांचं सोमवारी रात्री ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी दुपारी पातूर येथील डॉ. वंदनताई जगन्नाथराराव ढोणे ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले.

माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे यांचे हृदविकाराने निधन
सकाळ वृत्तसेवा
अकोला : भारतीय जनता पक्षाचे आणि माळी समाजाचे वरिष्ठ नेते माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे यांचं सोमवारी रात्री ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी दुपारी पातूर येथील डॉ. वंदनताई जगन्नाथराराव ढोणे ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जगन्नाथ ढोणे हे एम. एस. सर्जन होते. त्यांनी डॉक्टरकीसह राजकारणातही आपला ठसा उमटवला होता. डॉ. जगन्नाथ ढोणे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. उपचाराअंती ढोणे यांनी कोरोनावर मात मिळविली होती.

अकोट विधानसभा मतदारसंघातून ढोणे हे शिवसेनेचे पहिले आमदार होते. सन १९९० साली डॉ. जगन्नाथ सिताराम ढोणे यांनी अकोट मतदारसंघातून शिवसेना पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. त्यांनी काँग्रेस उमेदवार सुधाकर गणगणे यांचा पराभव केला होता. त्यानंतर १९९५ साली ढोणे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.

सन १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यानंतर विदर्भाच्या प्रश्नी लढा दिला होता. डॉ. ढोणे हे राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक होते. सात वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर प्रदेश कार्यकारणी सदस्य, अकोला जिल्हा भाजप सिंचन परिषदेचे संयोजक अशी जबाबदारी सोपवली होती. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस ,काँग्रेस आणि भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. वयाच्या ६० वर्षांनंतरही ते भाजपात सक्रिय नेते होते. नुकताच रेल्वे स्थानकावरील कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली होती. त्यांच्या निधनामुळे पातूरवर शोककळा पसरली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री, आमदारांच्या शोकसंवेदना
विदर्भवादी तसेच विदर्भाच्या विकासासाठी सतत संघर्ष राहणारे अभ्यासू नेतृत्व सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण अकोला जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव तत्पर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी डॉ. जगन्नाथ ढोणे यांच्या निधनाने एक चांगला सहकारी गमावला आहे, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. विश्व हिंदू परिषद रामजन्मभूमी आंदोलनात महत्त्वपूर्ण योगदान देणारे तसेच रामनवमी शोभायात्रा समितीचे संस्थापक सदस्य सितारामजी ढोणे यांच्या संस्कारात सामाजिक राजकीय वाटचाल करणारे विदर्भवादी नेते जगन्नाथ ढोणे आपले सहकारी यांच्या निधनाने फार मोठी हानी झाली अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांनी ढोणे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

सामाजिक दायित्व लक्षात घेऊन जिल्ह्याच्या प्रत्येक समाजाची एक रूप होऊन भाजप विस्तारासाठी सदैव कार्यरत तसेच सिंचना विषयी जागृत नेतृत्व प्रखर वक्ते डॉ. जगन्नाथ जी ढोणे यांच्या निधनाने भाजपची फार मोठी हानी झाली अशा शब्दात जिल्हा भाजपाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

शेतकरी शेतमजूर व विकासाचा दृष्टिकोन ठेवून आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये कामगिरी करणारे जगन्नाथ ढोणे आपले सहकारी निघून गेल्याने ही हानी न भरून निघणारी असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रकाश भारसाकळे यांनी व्यक्त केली. श्रद्धांजली अर्पण केली.

ज्येष्ठ मार्गदर्शक व ओबीसी मागासवर्गीयांच्या समस्यांनी निराकरणासाठी सदैव तत्पर असणारे डॉक्टर जगन्नाथ ढोणे यांच्या निधनाने फार मोठी हानी झाली अशा शब्दात श्रद्धांजली अर्पण केली तर माळी समाज सोबत अठरापगड जाती बारा बलुतेदारांच्या समस्या याची जाण असणारा व जिल्ह्याच्या प्रत्येक कार्यामध्ये सकारात्मक बाबी चा विचार करणारे डॉ. जगन्नाथ ढोणे यांच्या निधनाने फार मोठी हानी झाली अशा शब्दात महापौर अर्चनाताई मसने यांनी आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण के. भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य तेजराव थोरात, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनीली श्रद्धांजली अर्पण केली.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Former MLA Dr. Jagannath Dhone dies of heart attack