esakal | गाडगेबाबांच्या दशसुत्रींनी दिले सेवेची उर्जा, मूर्तिजापूरच्या सुपूत्राचा राजभवनानात सन्मान! 

बोलून बातमी शोधा

Akola News Gadge Baba Dashasutri Murtijapur prashant deshmukh awarded Raj Bhavan!}

मुंबईतील संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्टच्या माध्यमातून स्वतःला 'सेवक' म्हणवून घेत कर्करुग्णसेवा करणारे व देशभरात स्वच्छतादूत बनून समाजसेवा करणारे येथील प्रशांत देशमुख यांना काल मुंबईतील राजभवनात राज्यपालांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गाडगेबाबांच्या दशसुत्रींनी दिले सेवेची उर्जा, मूर्तिजापूरच्या सुपूत्राचा राजभवनानात सन्मान! 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

मूर्तिजापूर (जि.अकोला) . : मुंबईतील संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्टच्या माध्यमातून स्वतःला 'सेवक' म्हणवून घेत कर्करुग्णसेवा करणारे व देशभरात स्वच्छतादूत बनून समाजसेवा करणारे येथील प्रशांत देशमुख यांना काल मुंबईतील राजभवनात राज्यपालांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. येथील युवा समाजसेवक प्रशांत देशमुख गेली अनेक वर्षे रुग्ण सेवा करीत आहेत व विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवून संत गाडगे महाराजांच्या लोकोत्तर कार्याचा वसा पुढे चालवत आहेत. त्यांच्या या कार्याची याची दखल घेत त्यांना राज्यपालांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
         मुंबईत देशभरातून उपचारासाठी येणाऱ्या  कॅन्सरग्रस्त व त्यांच्या नातेवाईकांची संत गाडगे महाराज मिशन ट्रस्टच्या माध्यमातून निवास, भोजन व औषधाची व्यवस्था ते करीत आहेत. 'स्वच्छता अभियाना'च्या माध्यमातून देशभरात स्वच्ता अभियान राबवून दारू, तंबाखू, गुटखा, बिडी, सिगरेटचे भयंकर दुष्परिणाम लोकांना समजावून सांगत व्यसनमुक्तीचा संदेश देऊन गाडगे महाराजांचा समाजसुधारणेचा वसा चालवित आहेत.


        कर्मयोगी संत गाडगेबाबांचा वसा बापूसाहेब देशमुखांच्या मार्गदर्शनात चालविणारे प्रशांत देशमुख यांना अलीकडेच पुण्धयश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबईतील राजभवनात आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार उदयनराजे भोसले, खासदार डॉ.विकास महात्मे, महेश्वर संस्थानचे युवराज यशवंतराव होळकर, सांगा फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर धोपटे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
         

गाडगे बाबांचे कार्य दशसुत्रीच्या माध्यमातून पुढे नेणारे देशमुख हे तरुण वयातच बाबांच्या आदर्शाने भारावून गेले आहेत. १९९५ पासून त्यांचा हा सेवेचा क्रम नित्यनेमाने सुरू आहे. पहाटे चार वाजतापासून कर्करोग रुग्णांच्या सेवेत सुरू होणारी त्यांची दिनचर्या रात्री उशिरापर्यंत सेवारत असते. पुन्हा त्याच ऊर्जेने पुढल्या दिवसाचा आरंभ होतो. राजभवनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार त्यांना प्रदान करून खऱ्या लोकसेवकाचा सन्मान केल्याने आनंद व्यक्त केल्या जात आहे.*
 

सेवक म्हणून काम करतो आहे. हा पुरस्कार गाडगे महाराज आणि आजोबा अच्युतदादा देशमुख यांना समर्पीत करतो. बापुसाहेबांच्या मार्गदर्शनात रुग्णसेवा व समाजकार्य करतो आहे. आणखी खूप करायचे आहे. विदर्भाच्या मातीचा हा सन्मान आहे.
-प्रशांत देशमुख, 'सेवक'
--------------------------

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

 

Alert : आज रात्रीपासून ३४ तासांची संचारबंदी

 

आर.आर.आबा सुंदरगांव पुरस्कारात सावळा गोंधळ

 

जी.श्रीकांत गेले ; राहुल रेखावार महाबीजचे नवे एमडी

 

बुलाती है मगर जाने का नही, प्रतिष्ठीत पुरुषांना अडकविण्यासाठी रचला जातो हनी ट्रॅप

 

अकोला-अकोट रस्त्याचे काम सुरू न केल्याने प्रशासनाचे कठोर पाऊल

 

मळणी यंत्रात अडकला तरूण, गतिमंद भावासह विधवा आईवर कोसळला दुखःचा डोंग