
ः हिंगणा-माझोड-वाडेगाव रस्त्यावर कोटींचा फफुरडा नागरिकांना सहन करावा लागत आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. हा रस्ता भाजपा-शिवसेना आघाडी सरकारच्या काळात पालखी मार्ग म्हणून मंजूर झालेला आहे.
माझोड (जि.अकोला) ः हिंगणा-माझोड-वाडेगाव रस्त्यावर कोटींचा फफुरडा नागरिकांना सहन करावा लागत आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. हा रस्ता भाजपा-शिवसेना आघाडी सरकारच्या काळात पालखी मार्ग म्हणून मंजूर झालेला आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, अद्यापही काम पूर्ण होण्याचे नाव घेत नाही. या रस्त्यावर सर्वत्र धूळ पसरली आहे. जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. गाडी चालवत असताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते.
सदर काम नागपूर येथील सुधीर कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतले असल्याची माहिती आहे. मात्र काम अत्यंतधिम्या गतीने सुरू आहे. तेव्हा संबंधित अधिकारी यांनी या रस्त्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.
अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा संपादन - विवेक मेतकर
|
|||