किरकोळ व्यापार बंद; उद्योग सुरू!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 February 2021

 जीएसटी कायद्यामधील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी ‘कॅट’व्दारे बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदमध्ये व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला असला तरी व्यापारी संघटनांचाच एक भाग असलेल्या उद्योग संघटनांनी सहभाग नोंदविला नाही. त्यामुळे बंद दरम्यान व्यापार बंद आणि उद्योग सुरू असे चित्र अकोला जिल्ह्यात दिसून आले.

अकोला : जीएसटी कायद्यामधील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी ‘कॅट’व्दारे बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदमध्ये व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला असला तरी व्यापारी संघटनांचाच एक भाग असलेल्या उद्योग संघटनांनी सहभाग नोंदविला नाही.

त्यामुळे बंद दरम्यान व्यापार बंद आणि उद्योग सुरू असे चित्र अकोला जिल्ह्यात दिसून आले. असे असतानाही विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी बंदाला शहर उत्तम प्रतिदास लाभल्याचा दावा केला आहे.

जीएसटी कायद्यातील तरतुदींच्या निषेधार्थ देशव्यापी व्यापार बंदचे आवाहन करण्यात आले होते. अकोला शहरातील सर्व असोसिएशनच्या व्यापाऱ्यांनी यात सहभाग घेतला. प्रतिष्ठाने बंद ठेवून या बंदला पाठिंबा दिला. मात्र, त्याचवेळी विदर्भ चेंबरचा भाग असलेल्या अकोला इंडिस्ट्रिज असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे एमआयडीतील उद्योग व व्यवसाय बंददरम्यानही सुरू होते.

त्यामुळे संघटनेने केलेल्या आवाहनावरून बंद सहभागी झालेल्या व्यावसायिकांच्या काही संघटनांमध्ये नाराजीचा सूर होता. चेंबरकडून व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन करण्यात आले असताना त्यात पदाधिकाऱ्यांचे एमआयडीसीतील उद्योग व व्यवसाय बंददरम्यान कसे सुरू होते, असा प्रश्नही एका संघटनेच्या अध्यक्षांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

0

कोरोनामुळे उडू शकणार नाही ड्रोन!

0

70 फुट खोल विहिरीत तरंगत होता मृतदेह, रात्री दोन वाजता सुरू झाले सर्च ऑपरेशन

0

Video: अपघातात आले अपंगत्व, उपचारालाही पैसे नाहीत, अठराविश्व दारीद्र्याचा अनुसुया ओढते गाढा

0

पेट्रोल पंप दुपारी तीनपर्यंत सुरू, औषध दुकाने नियमित वेळेत

0

चार अधिकाऱ्यांना पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती !

0

धोक्याची घंटा; निवासी शाळेतील 229 विद्यार्थ्यांसह चार शिक्षकांनाही कोरोनाची लागण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News Retail closed; Start the industry!