शोधायला गेले चोरीची गाडी अन् टोळीच लागली हाताला!

Akola News The stolen vehicle was found in gamg
Akola News The stolen vehicle was found in gamg

अकोला : चोरीला गेलेली मोटारसायकल शोधण्यासाठी गेलेल्या रामदास पेठ पोलिसांच्या हाती मोटारसायकल चोरांची टोळीच लागली. आरोपीकडून चोरी केलेल्या नऊ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असून, पाच आरोपींनाही अटक करण्यात आली.


रामदास पेठ पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून एका चोरीच्या मोटारसायकलचा शोध घेण्यासाठी पथक गेले होते. या पथकाला खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून डाबकी रोड भागवत वाडीतील शुभम शंकर मार्गे (वय २५), आरपीटीएस रोड येथून शेख महेबुब शेख इलियास (वय २६) आणि रिजवान उर्फ लाला रियाज खान (वय १९) यांना ताब्यात घेतले.

त्यांची चौकशी केली असता सहा विविध कंपनीच्या चोरीच्या गाड्या आढळून आल्यात.त्यानंतर दुसरी कारवाई करीत घुसर येथील नागसेन तुकाराम गोपनारायण (२७) आणि मातानगर येथील अक्षय शेषराव डोंगरे (वय २७) यांना ताब्यात घेतले.

त्यांकडून चोरीच्या दोन गाड्या व गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. ही कारवाई रामदास पेठ पोलिस स्टेशनेचे ठाणेदार गजानन गुल्हाणे यांनी व त्यांच्या पथकातील किशोर गवळी, प्रशांत इंगळे, शेख हसन, पप्पू काझी, श्रीकांत पातोंड, गजानन खेडकर, स्वप्निल चौधरी, विशाल चव्हाण, शिवकुमार दुबे, अमोल शिरसाठ, अन्सार शेख, संजय अकोटकर यांनी केली. पुढील तसापस किशोर गवळी व प्रशांत इंगळे, शेख हसन करीत आहेत.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com