जिल्हा बँक निवडणुकीत १८ उमेदवार रिंगणात; १२ अविराेध, उमेदवारांकडून मतदारांची मनधरणी

Akola Political News 18 candidates in the fray in District Bank elections; 12 Unopposed, Candidates' choice of voters
Akola Political News 18 candidates in the fray in District Bank elections; 12 Unopposed, Candidates' choice of voters

अकाेला  : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या २१ जागांसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. सहा तालुक्यातील सेवा सहकारी संस्था मतदारसंघातील मतदार या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. सध्या एकूण १२ उमेदवार अविराेध निवडून आले असून, उर्वरित जागांसाठी १८ उमेदवार निवडणूक रिंगगणार आहेत. शनिवार, ता.२० फेब्रुवारी राेजी मतदान होणार असून, ता. २१ तारखेला मतमाेजणी हाेणार आहे.


अकाेला व वाशीम जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. इतर निवडणुकांप्रमाणे फारशी चर्चा न हाेताच जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. निवडणुकीत बिनविराेध नामांकन असलेल्या उमेदवारांची संख्या १२ आहे.

हेही वाचा - Lockdown Breaking: रविवारी राहणार संपूर्ण लॉकडाउन…!

यात सेवा सहकारी संध्या मतदारसंघातून बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे, बार्शीटाकळीमधून दामाेदर काकड, बाळापूर- राजेश राऊत, पातूर-जगदिश पाचपाेर, मूर्तिजापूर- सुहासराव तिडके, रिसाेड येथील आमदार अमित झनक व मंगरूळपीर येथील सुभाष ठाकरे यांना समावेश आहे. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून अंबादास तेलगाेटे, इतर मागासवर्गीयमधून डाॅ. सुभाष काेरपे, भटक्या जाती-विमुक्त व विशेष मागासवर्गीयमधून रामसिंग जाधव, कृषी पणन, शेतीमाल प्रक्रियेतून शिरीष धाेत्रे, औद्याेगिक, मजूर, विणकर, वैयक्तिक भागधारक मतदारसंघातून वामनराव देशमुख यांचा समावेश आहे.

हेही वाचा - धोका वाढला; रविवारी संपूर्ण दिवसभर तर दररोज रात्रीची संचारबंदी

या उमेदवारांवर आहे लक्ष
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत १८ उमेदवार रिंगणात आहे. अकाेटमधून विनाेद मंगळे व रमेश हिंगणकर, तेल्हारामधून रुपाली खाराेडे व नारायण माहाेड, वाशीममधून महादेव काकडे व भागवत काेल्हे, मालेगावमधून प्रकाश कुटे व दिलीप जाधव, मानाेरामधून तुषार इंगाेले, सुरेश गावंडे व उमेश ठाकरे, कारंजामधून श्रीधरराव कानकिरड, विजय काळे यांचा समावेश आहे. महिला प्रतिनिधी मतदारसंघातून भारती गावंडे, मंदा चाैकशी व छाया देशमुख यांचा समावेश आहे. पगादार व इतर सभासद मतदारसंघातून वामनराव देशमुख व हिदायत पटेल उभे आहेत.

हेही वाचा - धक्कादायक; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आणखी २७ विद्यार्थी पॉझिटिव्ह

११०० मतदार बजावणार मतदानाचा हक्क
जिल्हा बँक निवडणुकीत ११०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सर्वाधिक ८२२ मतदार हे सेवा सहकारी संस्था मतदारसंघात आहे. अकाेला, बार्शीटाकळी, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, रिसाेड, मंगरूळपीर येथे एकच अर्ज असल्याने उमेदवार बिनविराेध झाले, हे येथे उल्लेखीय. कृषी पणन-शेतीमाल प्रक्रिया संस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि जिल्हा सहकारी बाेर्ड मतदारसंघ आणि औद्याेगिक-मंजूर विणकर व वैयक्तिक भागधारक मतदारसंघासाठी प्रत्येकी एकच एकच अर्ज आला असून, मतदारांची संख्या अनुक्रमे २८ व २६ आहे. पगारदार नाेकरांच्या पतसंस्था व इतर सभासद मतदारसंघात दाेन उमेदवार असून, मतदारांची संख्या २२४ आहे.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

भिती वाढतेय; पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ९० नव्या रुग्णांची भर

तुम्हाला उद्योग करायचा आहे का? मिळणार आर्थिक बळ आणि ट्रेनिंगही

बस थांबली, महामार्ग ठप्प!, दहा किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा

राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com