ट्रकने दिली हुलकावणी, कारचे नियंत्र सुटले अन् मायलेकींचा मृत्यू

सकाळ वृत्तसेेवा
Monday, 15 February 2021

याच विहिरीत दोन दिवसापूर्वी बीड येथील कार कोसळली होती. त्यात दोन युवकांचा मृत्यू झाला होता. अपघातग्रस्त वाशीम जिल्ह्यातील असून, ते औरंगाबाद येथील काम आटोपून सकाळी परत निघाले होते. एका ट्रकने त्यांच्या कारला हुलकावणी दिल्याने चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्त्यापासून दहा फूट असणाऱ्या विहिरीत कोसळली.

वाशीम  : जालना ते देऊळगावराजा मार्गावर रस्त्यालगत असलेल्या विहिरीत रविवारी (ता.१४) सकाळी सात वाजता कार कोसळून मायलेकीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेतील तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले.

याच विहिरीत दोन दिवसापूर्वी बीड येथील कार कोसळली होती. त्यात दोन युवकांचा मृत्यू झाला होता. अपघातग्रस्त वाशीम जिल्ह्यातील असून, ते औरंगाबाद येथील काम आटोपून सकाळी परत निघाले होते. एका ट्रकने त्यांच्या कारला हुलकावणी दिल्याने चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्त्यापासून दहा फूट असणाऱ्या विहिरीत कोसळली.

अधिक वाचा - शेतकरी नेते राकेश टीकैत शनिवारी अकोल्यात, संयुक्त किसान मोर्चा फुंकणार आंदोलनाचे बिगुल

कार बाहेर काढण्यासाठी क्रेन मागविण्यात आली आहे. घटनास्थळ हे जालन्या लगत असलेल्या जामवाडी शिवारात आहे.

अधिक वाचा -राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू

या अपघातात वाशीम जिल्ह्यातील (शिंगडोह, देवठाणा) येथील आरती गोपाळ फादडे (वय ३०) आणि तिच्या चार वर्षीय माही या मुलीचा बुडून मृत्यू झाला. गोपाळ विठ्ठल फादडे (वय ३५), वेदिका फादडे आणि जय वानखेडे (वय १७) या तिघांना ग्रामस्थांनी सुखरूपपणे बाहेर काढले.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

भिती वाढतेय; पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ९० नव्या रुग्णांची भर

तुम्हाला उद्योग करायचा आहे का? मिळणार आर्थिक बळ आणि ट्रेनिंगही

बस थांबली, महामार्ग ठप्प!, दहा किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा

अकोल्यात शेतकरी पुत्रांचा अनोखा ‘व्हॅलेंटाईन डे’; हातात काटेरी गुलाब घेऊन केलं आंदोलन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Washim Marathi News Accident truck car mother and daughter lost control