
पालकमंत्री शंभूराज देसाई हे वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री आहेतच, सोबतच राज्याचे गृहराज्यमंत्री सुद्धा आहेत. त्यांच्या पालकत्वात अवैध व्यवसायाला सोन्याचे दिवस येत असतील, तर इतर जिल्ह्यात काय परिस्थी असेल? पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ही बाब लक्षात घेऊन उपाययोजना करणे गरजेचे असून, अन्यथा आम्ही पोरकेच बरे असा सूर जिल्ह्यातील जनतेतून निघत आहे.
वाशीम : जिल्ह्याचे पालकत्व असलेले व राज्यामधे गृहराज्यमंत्री असलेले शंभूराज देसाई यांचे पालकत्व जिल्ह्यासाठी नुसता खोळंबा ठरत आहे. जिल्ह्यात अवैध व्यवसायांनी पातळी सोडली असून, हमरस्त्यावर राजरोसपणे कायद्याच्या प्रतिष्ठेची हर्राशी होत असल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्यात दिसत आहे. एका वर्षापूर्वी राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर जिल्ह्याचे पालकत्व सातारा जिल्ह्यातील शिवेसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सोपविण्यात आले.
पाचशे किलोमीटरवरचे पालकत्व मिळाल्याने शंभूराज देसाई आधीच नाराज असल्याचे वृत्त चक्क साताऱ्यातून प्रसिद्ध झाले होते, मात्र नंतर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला पालकमंत्री उपस्थित राहीले होते. आता जिल्ह्याचा गाडा सुरळीत होईल ही आशा असताना पालकमंत्री शंभूराज देसाई तब्बल पाच महिने फिरकलेच नाहीत.
अधिक वाचा - शेतकरी नेते राकेश टीकैत शनिवारी अकोल्यात, संयुक्त किसान मोर्चा फुंकणार आंदोलनाचे बिगुल
परिणामी इथली प्रशासन व्यवस्था सैलावली. अवैध व्यवसायावरचे बंध सैल होत गेले. आता तर ते इतके सैल झाले की, त्यामधे बेफामपणा आला आहे. वाशीम शहर व जिल्ह्यात इतरत्र महामार्गावर सरेआम वरली मटक्याचे अड्डे थाटण्यात आले आहेत. सर्वसामान्यांना लाज वाटावी अशी परिस्थीती निर्माण झाली असून, जिल्ह्यात कायदा आहे काय ? हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
अधिक वाचा - राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू
असल्या पालकत्वापेक्षा पोरके बरे
पालकमंत्री शंभूराज देसाई हे वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री आहेतच, सोबतच राज्याचे गृहराज्यमंत्री सुद्धा आहेत. त्यांच्या पालकत्वात अवैध व्यवसायाला सोन्याचे दिवस येत असतील, तर इतर जिल्ह्यात काय परिस्थी असेल? पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ही बाब लक्षात घेऊन उपाययोजना करणे गरजेचे असून, अन्यथा आम्ही पोरकेच बरे असा सूर जिल्ह्यातील जनतेतून निघत आहे.
अधिक वाचा - अकोल्यात प्रथमच शॉर्ट फिल्म फेस्टिवल स्पर्धा
गुटख्याचे वाशीम झाले हब
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे राज्याचे गृहराज्यमंत्री पदाबरोबरच उत्पादन शुल्क विभागाचाही प्रभार आहे. गृहविभागाच्या राज्यमंत्रीपदाचा धाक खुद्द पालकत्वाच्या जिल्ह्यात राहीला नसल्याचे चित्र असताना, उत्पादन शुल्क विभागानेही पालकत्व जुमानत नसल्याचे दाखवून दिले की, काय अशी शंका येण्याजोगी परिस्थीती निर्माण झाली आहे. वाशीम शहर व जिल्ह्यात इतरत्र अवैध गुटखा व्यवसाय राजरोसपणे सुरू असून, या व्यवसायाने सोन्याचा व्यवसाय म्हणून ख्याती मिळविली आहे. दर आठवड्याला कोट्यावधींचा गुटखा रीचवला जात असून, पालकमंत्री मात्र साताऱ्यात बसून वाशीम जिल्ह्याचा कारभार बघत असल्याची चर्चा आहे.
अधिक वाचा - अकोल्यात शेतकरी पुत्रांचा अनोखा ‘व्हॅलेंटाईन डे’; हातात काटेरी गुलाब घेऊन केलं आंदोलन
अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा
संपादन - विवेक मेतकर
अधिक वाचा -
भिती वाढतेय; पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ९० नव्या रुग्णांची भर
तुम्हाला उद्योग करायचा आहे का? मिळणार आर्थिक बळ आणि ट्रेनिंगही
बस थांबली, महामार्ग ठप्प!, दहा किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा