अ‍ॅग्रो

एकीचे बळ, मिळते फळ 

अभिजित डाके

‘एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ'' या वचनाप्रमाणे पाचशे शेतकरी एकत्र आले आणि सुरू झाली रत्ना फार्मर प्रोड्यूसर कंपनी. शेतकऱ्यांची साथ आणि ग्राहकांचा विश्‍वास या जोरावर गोटखिंडी (ता. वाळवा, जि. सांगली) येथील रत्ना फार्मर प्रोड्यूसर कंपनीने भरारी घेतली आहे.

शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ आणि दर चांगला मिळाला तरच आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होते. अल्पभूधारक शेतकऱ्यांना स्वतःचे शेतीमाल विक्री मॉडेल उभे करणे आणि ते चालवणे फार कठीण असल्याचा अनुभव येतो. असाच अनुभव गोटखिंडी (जि. सांगली)  येथील वैभव कोकाटे यांना आला. कोकाटे हे हरितगृहात विदेशी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. त्यांना परिसरातील पाच शेतकरी मित्रांची चांगली साथ मिळाली. मात्र भाजीपाला विक्रीची वेळ आल्यावर त्यांना बाजारपेठ लवकर मिळाली नाही. परंतु प्रयोगशीलता, अपार कष्ट यामध्ये सातत्य ठेवल्याने त्यांनी स्वतः नवीन बाजारपेठ शोधली. यातूनच पुढे शेतकऱ्यांना एकत्र घेऊन कंपनी आणि भाजीपाला विक्रीची दिशा मिळाली.

विक्री साखळी केली भक्कम 
मार्च महिन्यात कोरोना प्रादुर्भाव झाला आणि भाजीपाला विक्रीचे गणित कोलमडले. मात्र या संकटातून नवी वाट दिसली. कंपनीने मागमीनुसार विविध वजनांमध्ये भाजीपाला पॅकिंग करून थेट विक्रीचा पर्याय स्वीकारला. पुणे शहरासह सांगली, कोल्हापूरमध्ये थेट विक्रीला सुरुवात झाली. यामुळे विक्री साखळी भक्कम झाली. कंपनीने वीस शेतकऱ्यांचा एक गट तयार केला. गटातील शेतकऱ्यांना कोणत्या भाजीपाला पिकाची लागवड करावी, काढणी कधी करावी याची माहिती एकाच वेळी दिली जाते. त्यामुळे काढणीपश्‍चात पॅकिंग, विक्री शक्य होते. 

कंपनीचे स्वतःचे ॲप 
शहरी भागात भाजीपाल्याची वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनीने ॲप विकसित केले आहे. यामुळे ग्राहकांना त्यांची मागणी नोंदविणे शक्य होते. 

वीस गुंठ्यांपासून ते पाच एकरांवर भाजीपाला लागवड करणारे शेतकरी सोबत आहेत. पीक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करतो. हमीभाव देत असल्याने शेतकऱ्यांचा फायदा होतो.
- वैभव कोकाटे,  ९८२२२४३१३२, अध्यक्ष, रत्ना फार्मर प्रोड्यूसर कंपनी 

दोन वर्षांपासून मी कंपनीचा सभासद आहे. भाजीपाला लागवडीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन मिळते. यामुळे शेती खर्चात बचत झाली. भाजीपाल्यास कंपनीकडून हमी दर मिळतो आहे. 
- आकाश पाटील कामेरी, जि. सांगली

आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT