rice 
अ‍ॅग्रो

राज्यातून तांदूळ निर्यातवाढीसाठी विशेष आराखडा

राजकुमार चौगुले

कोल्हापूर : राज्यातून तांदळाची निर्यात करण्याकरिता कृषी विभागाने जोरदार पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. राज्यातून बिगर बासमती भाताची निर्यात वाढविण्यासाठी भात उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी करून त्यांना भाताची रोपे तयार करण्यापासून ते काढणीपर्यंत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी लेबल क्‍लेम कीडनाशकांचा वापर करून निर्यातीसाठी आवश्‍यक दर्जाचा तांदूळ तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. 

२०२१-२२ या वर्षापासून यासाठीची थेट अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरू होईल. यासाठीची तयारी आतापासून करण्याचे आदेश कृषी विभागाने जिल्हा पातळीवर दिले आहेत. राज्यातून पुढील वर्षात जास्तीत जास्त तांदळाची निर्यात वाढावी यासाठी ‘अपेडा’च्या मदतीने हे प्रयत्न करण्यात येतील, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. निर्यात वाढीसाठी भात उत्पादक जिल्ह्यामध्ये कसे प्रयत्न करता येतील याबाबतची माहिती आयुक्तालयाने जिल्हा स्तरावरून मागविली आहे.

तांदूळ उत्पादनाबाबतची स्थिती
बिगर बासमती तांदूळ निर्यात करणारे महाराष्ट्र हे तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. राज्यातून प्रामुख्याने विदर्भ, कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रातून निर्माण होणारा तांदूळ निर्यात केला जातो. सन २०१९-२० मध्ये राज्यातून ६ लाख टनांची निर्यात झाली. यातून १८०२ कोटी रुपयांचे मूल्य राज्याला मिळाले. राज्यात भात पिकाखालील १६ लाख हेक्‍टर क्षेत्र असून, उत्पादन ३२ लाख टन होते. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा घनसाळ व पुणे जिल्ह्यातील आंबेमोहोरला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे.

आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

...असे होणार प्रयत्न

  • इतर पिकांसाठी ज्या प्रमाणे निर्यातीसाठी ऑनलाइन नोंदणी केली जाते. त्याच धर्तीवर भात उत्पादकांना नोंदणी करता येणार
  • तालुकास्तरावर ऑफलाईन नोंदणीही सुरू करणार. उत्पादकांची यादी तयार होणार
  • नोंदणीकृत शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अन्नप्रक्रीया योजनेतून प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्याचे प्रयत्न
  • कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, राइस मिलधारक, खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांचा यामध्ये सहभाग घेणार
  • ‘आत्मा’च्या सहकार्याने भात उत्पादकांचा गट स्थापन करणार
  • पणन मंडळामार्फत भौगोलिक नामांकन प्राप्त पिकांसाठी प्रशिक्षण योजनेचा लाभ

हेही वाचा : फुलांच्या शेतीला हवा ‘एकी’चा दरवळ

भात उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातीचा लाभ मिळवून देणे, राज्याला तांदूळ निर्यातीत अग्रेसर करण्याच्या दृष्टीने आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहोत. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हावार आराखडे आम्ही तयार करीत आहोत. लवकरच प्रशिक्षण व अन्य कार्यक्रमास प्रारंभ होईल.
- विकास पाटील, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण), कृषी आयुक्तालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT