Army Worm Attack on Mango Flowering Ratnagiri Marathi News 
अ‍ॅग्रो

भूर्दंड ! आंब्याच्या फुलोऱ्यावर 'यांचा' हल्ला 

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - गुलाबी थंडीची चाहूल लागल्यानंतर आंबा बागायतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते; मात्र गेल्या आठ दिवसांमध्ये अधूनमधून निर्माण होत असलेल्या ढगाळ वातावरणाने आंबा कलमांच्या फुलोऱ्यावर कीडरोग दिसू लागले आहेत. रत्नागिरी तालुक्‍यात लष्करी अळींचा हल्ला झाला आहे. ही अळी मोहोरातील रस शोषून घेते आणि कैरी कुरतडून खराब करते. त्यावर नियंत्रणासाठी फवारण्यांवर फवारण्या कराव्या लागत आहेत. 

लांबलेल्या पावसामुळे आंबा उत्पादन उशिरा मिळणार, हे निश्‍चित झाले आहे; मात्र त्यातही वातावरणातील बदलांचा परिणाम उत्पादकांना सोसावा लागत आहे. दीड महिना उशिराने डिसेंबर महिन्याच्या शेवटी थंडीचे आगमन झाले. त्यानंतर पालवलेली आंबा कलमे मोहोरु लागली होती. ते प्रमाण वीस टक्‍क्‍यांपर्यंत होते. 

उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्‍यता

ऑक्‍टोबरला जी पालवी आली होती, ती कमी - जास्त थंडीमुळे जून होण्यास उशिर होत आहे. अधुनमधून वातावरण बदलत असून दमट हवेमुळे कीड, तुडतुडा, थ्रिप्ससह लष्करी अळींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव सुरु झाला आहे. त्याबरोबर उंटअळीही दिसून येत आहे. लष्करी अळी अनेक ठिकाणी दिसू लागल्यामुळे बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. लष्करी अळींसह तुडतुडा आणि अन्य कीडरोगांमुळे खर्च वाढत असून त्याचा उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. कीड नियंत्रणासाठी सगळ्या झाडांवर फवारणी करावी लागते. 

पालवीला येणार फेब्रुवारीत मोहोर

जिल्ह्यातील बागांमध्ये शेंगदाण्याएवढी कैरी, काळा वाटाण्याएवढी कैरी तर सुपारीएवढ्या कैरीचे 20 टक्‍के प्रमाणे आहे. काही ठिकाणी फुलोरा असून बहुतांश ठिकाणी अजूनही पालवी दिसते. पालवीमधील 25 टक्‍के कलमांना फेब्रुवारीत मोहोर येईल. नव्याने आलेल्या पालवीतून मिळणारे उत्पादन एप्रिल, मे महिन्यात मिळेल. 

फळगळ होण्याची शक्यता

यंदा मार्चला आंबा नगण्य राहणार आहे. त्यामुळे उत्पन्नात घट निश्‍चित आहे. मार्च महिन्यात थंडी वाढली तर पुनर्मोहोराच्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. त्यातून लागलेलं फळ गळून पडण्याची भीती आहे. 
राजेंद्र कदम, आंबा बागायतदार 

मोहोरातील रस शोषून घेते, कैरीला चावते, कुरतडते.. 

ही अळी फुलोऱ्यातील मोहोरावर आढळून येत आहे. ती मोहोरातील रस शोषून घेते, कैरीला चावते, कुरतडते. त्यामुळे मोहोरासह कैरी खराब होते. सुरवातीला आलेल्या मोहोरांची दांडीच फक्‍त शिल्लक राहते. परिणामामुळे फवारणीचा खर्च वाढत आहे. नियमितपणे पंधरा दिवसांनी बागायतदार औषध फवारणी करतात. पण कीडरोगांमुळे 7 ते 8 दिवसांनी फवारणी करावी लागत आहे. सर्वसाधारणपणे एका फवारणीला हेक्‍टरी 25 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

SCROLL FOR NEXT