आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये मेथीचे दाणे आणि पानांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. मेथीची पाने भाजी म्हणून आणि दाणे हे मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरले जातात. कसुरी मेथी नावाने प्रचलित असलेली
वाळवलेली मेथीची पाने त्यांच्या सुगंधामुळे विविध पदार्थांत वापरली जातात. मेथीचे बीज फारच कडू असते, त्यास भाजून त्यातील कडूपणा कमी करता येतो.
मेथीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आढळतात. ज्याचा आरोग्यावर खूप चांगला फायदा होतो. मेथीमध्ये थियामिन, फॉलिक ॲसिड, रिबोफ्लाव्हिन, नियासिन, जीवनसत्त्वे अ, बी ६ आणि सी सारख्या जीवनसत्त्वे असतात, तसेच तांबे, पोटॅशियम, कॅल्शिअम, लोह, सेलेनियम, जस्त, मॅंगनीज आणि मॅग्नेशिअम सारखी खनिजे आहेत. मेथीचे दाणे जीवनसत्त्व के चा समृद्ध स्रोत आहे. जे आपल्या शरीरासाठी लाभदायक ठरतात.
आरोग्यदायी फायदे
हेही वाचा : वाढत्या थंडीचे फळबागांवरील परिणाम
इतर वापर
मेथीची वाळलेली पाने नैसर्गिक कीटकनाशक म्हणून धान्य साठवणुकीत वापरतात.
उत्तर आफ्रिकेच्या काही भागामध्ये, मेथीचे दाणे साखर आणि शुद्ध तेल यांच्या मिश्रणात वजन वाढविण्यासाठी खातात.
अनेक पाश्चात्त्य देशांमध्ये अद्यापही पशुवैद्यकीय औषधे म्हणून मेथीचा वापर केला जातो.
सुग्रीव शिंदे, ८९७५३९९४९१
(अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.