Cow Milk sakal
अ‍ॅग्रो

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! गायीच्या दूधदरात 'इतक्या' रुपयांनी घसरण; पशुखाद्यातही दरवाढ

गायींच्या दूधदरात (Milk Rate) प्रतिलिटर चार रुपयांची घसरण झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

गायीच्या (Cow) दुधाला सध्या फॅटनुसार ३७ रुपयांपर्यंत प्रतिलिटर असा दर होता. दरम्यान, काही दिवसांपासून दरात चार रुपयांची घसरण होऊन दर ३३ रुपये प्रतिलिटरपर्यंत झाला आहे.

घाटनांद्रे : गायींच्या दूधदरात (Milk Rate) प्रतिलिटर चार रुपयांची घसरण झाली आहे. ३७ रुपये प्रतिलिटर असणारा दर ३३ रुपये झाल्याने पशुपालक शेतकऱ्यांतून (Farmers) नाराजी व्यक्त केली जात आहे. व्यवसाय सध्या अडचणीत आला आहे.

याबाबत माहिती अशी की, कवठेमहांकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावरील घाटनांद्रे, वाघोली, तिसंगी, गर्जेवाडी, कुंडलापूर, जाखापूर, कुची येथे दुग्ध व पशुपालन हा शेतीपूरक व दुय्यम व्यवसाय समजला जातो. घाटमाथ्यावर जनावरांची संख्या सात हजारांपर्यंत आहे. त्यामध्ये जर्सी दुभत्या गायींचे प्रमाण अधिक आहे.

गायीच्या (Cow) दुधाला सध्या फॅटनुसार ३७ रुपयांपर्यंत प्रतिलिटर असा दर होता. दरम्यान, काही दिवसांपासून दरात चार रुपयांची घसरण होऊन दर ३३ रुपये प्रतिलिटरपर्यंत झाला आहे. मात्र म्हशीच्या दूधदरात कोणतीही घसरण झालेली नाही. जनावरांच्या पशुखाद्यात दरवाढ झाली आहे.

पाठोपाठ शेतकऱ्यांकडे उपलब्ध चारा संपुष्टात आल्याने ओला चारा ऊस, कडबा, मुरघास, मका, कडबा यांचे दरही भडकलेत. पाऊस लांबल्याने नैसर्गिक चाराही उपलब्ध नाही. पशुपालक शेतकऱ्यांना जनावरांच्या चाऱ्यासाठी जादा भुर्दंड सोसावा लागत आहे.

पशुखाद्यांचे दर

  • एस.ए.पी. १४०० (४० किलो)

  • गौरी खत १२५० (४०किलो)

  • मक्का आटा १००० (४५ किलो)

  • गहू आटा १३०० (४५ किलो)

  • मिल्क मोर १५५० (५० किलो)

  • शेंग पेंड २६०० ते ३००० (५०किलो)

  • गोळी पेंड १२०० ते१७०० (५०/६० किलो)

  • सरकी पेंड १२०० ते १४१० (४० किलो)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More Video: शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी..,दुबेंना मोरेंनी खडसावलं..

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT