अ‍ॅग्रो

बचत गटांतील महिलांमध्ये रुजले उद्यमशीलतेचे बीज

विनोद इंगोले

नागपूर : महिला स्वयंसाह्यता गटाच्या माध्यमातून विदर्भात मोठी चळवळ उभी राहिली आहे. दुर्गम चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांतील महिलांमध्ये देखील ही चळवळ दुर्दम्य आत्मविश्‍वास निर्माण करण्यास पूरक ठरली आहे. चंद्रपूर जिल्ह्याने गटांना कर्जवाटपात राज्यात आघाडी घेतली आहे. तब्बल ९४ कोटी रुपयांचे कर्जवाटप या जिल्ह्यात करण्यात आल्याची माहिती लीड बँकेच्या व्यवस्थापकांनी दिली.

महिला आर्थिक विकास महामंडळ या सोबतच जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या उमेद अभियानाच्या माध्यमातून महिला स्वयंसाह्यता गटांचे संनियंत्रण होते. उमेद अभियान अंतर्गत असलेल्या महिला गटांना १५ हजार रुपयांचा फिरता निधी (रिव्हॉल्व्हिंग फंड) दिला जातो. 

विदर्भात महिला गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा उद्देश बहुतांशी साधण्यात यश आले आहे. त्यामुळेच शेवया, कुरडया, पापड या पारंपरिक व्यवसायांसोबत शेतीपूरक व्यवसायदेखील उद्योजक म्हणून महिलांनी नावलौकिक मिळविला आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये २० हजार ६९५, तर पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये २१ हजार ६५२ महिला गट आहेत. त्यांना पूरक प्रशिक्षण व वित्तपुरवठा करीत त्यांचे सक्षमीकरण करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात उमेद अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ त्यासोबतच अंबुजा फाउंडेशन व इतर खासगी संस्थांना मिळून ३५ हजारपेक्षा अधिक समूह आहेत. 

अगरबत्ती, एलईडी लाइट उत्पादन यांसारख्या उद्योगांच्या माध्यमातून या समूहातील महिलांना बळ मिळाले आहे. एप्रिल २०१९ ते डिसेंबर २०२० या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यातील महिला गटांना तब्बल ९४ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. महिला गटांचे व्यवहार कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. त्यामुळेच वितरित केलेल्या एकूण कर्जापैकी सुमारे ९५ टक्के कर्जाचा परतावा त्यांच्याकडून होतो, असा आजवरचा अनुभव असल्याची माहिती लीड बँकेचे व्यवस्थापक शंभुनाथ झा यांनी दिली. त्यामुळेच जिल्ह्यात बचत गटाची गटांची चळवळ अधिक गतिमान झाली आहे. 

आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

जिल्ह्यात महिला गटांसाठी १०२ कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट होते. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या आर्थिक वर्षात ही उद्दिष्टपूर्ती करायची आहे. आजवर सुमारे ९४ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. आम्ही उद्दिष्टपूर्तीच्या टप्प्यात आहोत. राज्यात बचत गटांना कर्ज वितरणात चंद्रपूर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. 
 - शंभुनाथ झा, व्यवस्थापक, लीड बँक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Construction Workers: बांधकाम कामगारांच्या कुटुंबाला ५.२५ लाखांपर्यंत मदत; यूपी सरकारची योजना नेमकी काय?

Latest Marathi News Live Update : कोयना धरणातून नदीपात्रातील विसर्ग पूर्णपणे बंद

CNG vs EV, TERI Report : ‘सीएनजी’चा पर्यावरणीय भार ‘ईव्ही’पेक्षा कमी ‘टेरी’च्या अहवालातील निष्कर्ष ; कोळशावरील अवंलबित्व कारणीभूत

Kolhapur Gokul Election : 'गोकुळ' जागा वाटपाचा निर्णय गुलदस्त्यातच; कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? मुख्यमंत्री दोन दिवसांत देणार निर्णय

Green Energy Corridor Phase 3 : ‘ग्रीन एनर्जी कॉरिडॉर’ला मंजुरी वीजपुरवठा होणार सुलभ; राज्यांअंतर्गत वितरण प्रणाली मजबूत

SCROLL FOR NEXT