100 prisoners in 4 barak esakal
अहिल्यानगर

कोपरगाव कारागृहात कोरोना नियमांची ऐशी तैशी

मनोज जोशी

कोपरगाव (जि. अहमदनगर) : राज्यात कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) डोके वर काढण्याची शक्यता असताना येथील कोपरगाव दुय्यम कारागृहात कोरोनाच्या नियमाची ऐसी की तैशी होत आहे. केवळ चार बराकींत तब्बल एकशे एक आरोपींना ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तुरुंग प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. आरोपींच्या हक्कांची पायमल्ली होऊन त्यांना सुविधा मिळत नसल्याची बाब पुढे आले आहे.

जनावरांसारखे कोंबलेत आरोपी

तहसील कार्यलयाजवळ दुय्यम कारागृह आहे. कारागृहाच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक आरोपींची संख्या सध्या येथे आहे. एकूण पाच बराकी असून, १६ आरोपींना ठेवण्याची त्यांची क्षमता आहे. एक महिलांसाठी राखीव आहे. एक महिला आरोपीला राहुरी कारागृहात स्थलांतर केले आहे. कारागृहात चार तृतीयपंथी आरोपी असल्याने त्यांना एक स्वतंत्र बराक देण्यात आली, तर उर्वरित चार बराकींत प्रत्येकी २६ ते २७ आरोपींना अक्षरशः जनावरांसारखे कोंबण्यात आले आहे. कोपरगाव, राहाता, शिर्डी, लोणी परिसरातील खून, चोरी, रस्तेलूट, कौटुंबिक वाद आदी प्रकारांतील हे आरोपी असून सर्वाधिक आरोपी राहाता तालुक्यातील आहेत.

दहा बाय बाराची एक बराक असून, त्यातच आरोपींसाठी लघुशंका, शोचालयाची सोय करण्यात आली आहे. कोविड नियमाची तर सर्रास पायमल्ली होत आहे. झोपण्याच्या जागेअभावी गेल्या आठवड्यात आरोपींमध्ये हाणामारी झाली. याबाबत गुन्हाही दाखल आहे. आरोपींची संख्या वाढल्याने तुरुंग प्रशासन व पोलिस प्रशासनावर अतिरिक्त ताण पडत आहे. आरोपींना आरोग्य सुविधा देताना प्रशासनाची तारेवरची कसरत सुरू आहे.

झोपण्यासाठीही शिफ्ट

चार बराकींत एकशे एक आरोपींना ठेवण्यात आल्याने त्यांना झोपण्यासाठी देखील जागा नाही. जागेवरून त्यांच्यात अनेक वेळा हाणारमाऱ्याही होत आहेत. प्रशासनाने त्यावर नवा फंडा शोधला आहे. आरोपींना झोपण्यासाठी शिफ्ट ठरवून दिली आहे. त्यामुळे त्यांना दिलेल्या वेळेतच झोपावे लागत आहे.

''बरकीतील आरोपींची संख्या कमी करण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहेत. न्यायालयात अर्ज दाखल केला असून, ६० आरोपींची रवानगी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. न्यायालयाने केवळ तीन आरोपींना स्थलांतरित करण्याचे आदेश दिले आहेत.'' - अरुण रणनवरे, तुरुंग निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Tensions : इराणचा अमेरिकेला मोठा इशारा; युरोपसह इतर ठिकाणच्या लष्करी तळांनाही लक्ष्य करण्याची धमकी

Aircraft Accident: विमान अपघाताला अनधिकृत इथेनॉलमिश्रित इंधन कारणीभूत? डीजीसीएच्या चौकशीत धक्कादायक निष्कर्ष; मनुष्यबळावरही ठपका

Solapur Sugarcane Protest: ऊसदरासाठी शेतकरी आक्रमक; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली सोमवारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Maharashtra weather forecast : महाराष्ट्रात थंडीचा जोर आणखी वाढणार, कोकणपासून विदर्भापर्यंत आज कसे असेल हवामान? जाणून घ्या

Chia Pudding Recipe: नो शुगर, नो गिल्ट! ब्रेकफास्टला बनवा टेस्टी अन् तितकाच हेल्दी 'तिरामिसू चिया पुडिंग'; पाहा भन्नाट रेसिपी...

SCROLL FOR NEXT