लसीकरण मोहीम
लसीकरण मोहीम  sakal
अहमदनगर

श्रीगोंद्यातील निम्मे अजूनही लसीविना; गावोगावी लस राहतेय शिल्लक

संजय आ. काटे


श्रीगोंदे (जि. अहमदनगर) : कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी मोठा गाजावाजा झाला. मध्यंतरी लस मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या. रांगेत उभे राहून लोकांनी लस घेतली. लसीची कमतरता असल्याने प्रशासनही गोंधळलेले होते. मात्र सद्यस्थितीत निम्मा तालुका लसीच्या पहिल्या डोसअभावीच असल्याची माहिती समजली.


काही दिवसांपासून लस शिल्लक राहत असून लोक ती घेण्यासाठी येत नसल्याचे समजले. दरम्यान या गोंधळात कोरोना वाढल्याने तालुक्यातील दहा गावे लाॅकडाऊन केल्याने सामान्यांची हतबलता वाढली आहे. तालुक्यातील कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याचे प्रशासन सांगत असले तरी लोकांना ते मान्य नाही. इतर जिल्ह्याच्या तुलनेत आपल्याकडे कोरोना चाचणी होत असल्याने ही आकडेवारी पुढे येत आहे. असे मत अनेक व्यापाऱ्यांनी व्यक्त केले. अर्थात याला प्रतिबंध घातला जायला हवा. याविषयी सगळ्यांचे एकमत आहे. काही दिवसांपुर्वी रांगेत गर्दी करुन लस घेणारे लोक गायब झाल्याने तालुक्यात लस घेणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचा अंदाज प्रशासनाच्या आकडेवारीत फोल ठरत आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. नितीन खामकर म्हणाले, श्रीगोंदे तालुक्यात दोन लाख ५७ हजार ४०१ जणांना ही लस द्यायची आहे. त्यापैकी १ लाख ३३ हजार लोकांनी पहिला डोस घेतला आहे. हे प्रमाण ५१ टक्के आहे. यात ३७ हजार ३७२ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. म्हणजे दोन्ही लसीचे डोस घेणाऱ्या लोकांची संख्या १ लाख ७१ हजाराच्या घरात आहे. हे प्रमाण कमी असून प्रशासन व सामाजीक कार्यकर्ते कष्ट घेत असले तरी गावोगावी आलेली लस शिल्लक राहत असल्याचे वास्तव आहे.


काष्टी, कौठे, लोणीव्यंकनाथ, मढेवडगाव, येळपणे, कोळगाव, बेलवंडी, घारगाव, शेडगाव ही गावे १३ आक्टोंबरपर्यंत पुर्णपणे बंद करण्याचा फतवा प्रशासनाने काढला आहे. यातून बँका व कृषी सेवा केंद्रेही सुटले नाहीत. त्यातच महसूल व पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी दुकाने सील करण्याची मोहित हाती घेतल्याने सामान्य लोक, शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.



शेतकरी कामात गुंतले

शेतात कांदा लागवडीचा मोसम असून मजूर तेथे गुंतलेले आहेत. एकरी आठ ते दहा हजार रुपये ही लागवड असल्याने मजूरांचा ओढा तिकडे जास्त आहे. लस घेतल्यावर दोन दिवस घरी थांबावे लागेल या भावनेतून मजूर लस घेत नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT