accused cheating police esakal
अहिल्यानगर

कोळगावकरांनी पकडून दिलेल्या आरोपीची पोलिसांच्या हातावर तुरी

संजय काटे

श्रीगोंदे (जि.अहमदनगर) : कोळगाव येथे चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका गुन्हेगाराला गावकऱ्यांनी धाडसाने पकडले. बेलवंडी पोलिसांना माहिती देत या आरोपीला त्यांच्या हवाली केले; मात्र हा आरोपी पोलिसांना गुंगारा देत वाहनातून उडी मारून पसार झाला. विशेष म्हणजे बेलवंडी पोलिसांचे गस्ती पथक एक चालक आणि एक कर्मचारी, असे असल्याने आरोपीला आयती संधी मिळाल्याचे बोलले जाते. (Accused-cheating-with-police-marathi-news)

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

कोळगाव येथील नगर-दौंड महामार्गाजवळील एका वस्तीवर काल (मंगळवारी) चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र, सुगावा लागल्याने लोकांनी त्यातील एका चोरट्याला शिताफीने पकडले. त्याला धरून ठेवत बेलवंडी पोलिस ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली. काही वेळात बेलवंडी पोलिसांच्या गस्ती पथकातील वाहन तेथे आले. आरोपीला हाताला बांधून वाहनातून घेऊन गेले. दरम्यान, पोलिसांच्या वाहनात एक चालक व एक कर्मचारी, एवढाच ताफा होता. आरोपीने पोलिसांची ही स्थिती पाहिली आणि पोलिस ठाण्यात पोचण्यापूर्वीच वाहनातून उडी मारून पसार झाला. त्या वेळी वाहन सुरू होते की थांबलेले, याची निश्चित माहिती समजली नाही. मात्र, गावकऱ्यांनी पकडून दिलेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला, हे मात्र निश्चित.

लोकांनी आरोपीला पकडले हे चांगले झाले; पण पोलिस ठाण्याच्या वाहनात चालकासोबत दोनच कर्मचारी होते. काही गावकऱ्यांना काही वाहनात बसायला सांगितले होते; मात्र कोणीही बसले नाही. या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, शोध सुरू आहे. - संपत शिंदे, पोलिस निरीक्षक, बेलवंडी

गावकऱ्यांनी धाडसाने चोर पकडला व पोलिसांच्या ताब्यात दिला. त्यांच्या ताब्यातून तो कसा पळाला, याची चौकशी व्हावी. शिवाय, चोरटा पकडलेल्या वस्तीवर नंतर लगेच चोरी झाल्याने, ग्रामस्थांमध्ये दहशत आहे. - पुरुषोत्तम लगड, माजी सभापती, पंचायत समिती, श्रीगोंदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

आजचे राशिभविष्य - 26 सप्टेंबर 2026

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT