After the deadline, the focus shifted to action 
अहिल्यानगर

परस्पर भरती... खुलाशाची मुदत संपली... कारवाईकडे सर्वांचे लक्ष 

सकाळ वृत्तसेवा

नगर  : जिल्हा परिषदेतील एक अधिकारी त्यांची कामे खासगी व्यक्तीकडून करून घेतात, ही बाब "सकाळ'ने समोर आणल्यानंतर सामान्य प्रशासनाने तीन जणांना नोटीस बजावून खुलासा मागविला. त्याचीही मुदत संपली आहे. आता प्रशासन "त्या' व्यक्तीवर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

जिल्हा परिषदेतील एका विभागात अनेक वर्षांपासून खासगी व्यक्ती काम करीत आहे. ही बाब "सकाळ'ने समोर आणली. त्यानंतर सामान्य प्रशासनाने तातडीने तीन जणांना नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा मागविला. या प्रकरणाची चौकशी होणे अपेक्षित होते; मात्र तसे झाले नाही.

ती व्यक्ती जिल्हा परिषदेत किती दिवसांपासून येत होती? कोणकोणत्या विभागात काम करीत होती? ही नियुक्ती कोणी केली होती? कोणाला संगणक येत नाही? ही माहिती न घेताच, तो कर्मचारी कामकाजासाठी बसतो तेथील तिघांना नोटीस बजावून सामान्य प्रशासन विभागाने कारवाईचे सोपस्कार पूर्ण केल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे.

विशेष म्हणजे, लॉकडाउनमध्येही ती व्यक्ती जिल्हा परिषदेत येत होती. त्यामुळे त्या व्यक्तीकडे जिल्हा परिषदेचे ओळखपत्रही असण्याची शक्‍यता असल्याने, या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. यासाठी आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करून, या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या सदस्यांकडून होत आहे. 

खासगी व्यक्तीच्या नियुक्ती प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, याबाबत आपण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचित केले आहे. ज्यांना संगणक येत नाही, त्यांची इतरत्र बदली करावी. 
- काशिनाथ दाते, सभापती, बांधकाम व पशुसंवर्धन समिती. 


खासगी व्यक्ती जिल्हा परिषदेत कामकाज करीत असल्याची शहानिशा करण्यात येणार आहे. त्यानंतर ही बाब मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली जाईल. 
- विकास साळुंके, अध्यक्ष, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना , अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! महाराष्ट्रासह 21 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 85 किमी वेगाने वाहणार वारे; माॅन्सून परतण्यापूर्वी वाढणार चिंता

IND VS AFG 3RD T20I: २० चेंडूंत १०२ धावा... Abhishek Sharma ने ट्वेंटी-२०चा इतिहास-भूगोल बदलला! एक नव्हे अनेक विक्रम मोडले, सेलिब्रेशन तर भारीच केले Video Viral

Tarapur Leopard Scare: तारापूर-चिंचणी परिसरात बिबट्याला गुरांचा चोप; नागरिकांमध्ये भीती, वनविभागाकडे जेरबंदाची मागणी

Latest Marathi News Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

SCROLL FOR NEXT