ahnednagar  sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : जनआरोग्यासाठी नहेमूद नदाफ यांचे अग्निहोत्र ; दोन तपांपासून प्रचार नवोदितांना मोफत प्रशिक्षण

भारतीय संस्कृतीत अग्निहोत्राला महत्त्वाचे स्थान आहे. अग्निहोत्र म्हणजे अग्नीमध्ये आहुती अर्पण करून केली जाणारी ईश्वरी उपासना.

मुरलीधर कराळे :सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - शरिरासाठी व्यायाम, याग, योगासने करणे हे सर्व मनुष्यांसाठी उपयुक्त असते. हाच गुरुमंत्र देत येथील नहेमूद नदाफ हे गेल्या दोन तपांपासून अग्निहोत्र करीत आहेत. एवढेच नाही, तर अग्निहोत्राचा प्रचार व मोफत प्रशिक्षण देत आहेत. त्यामागील सायन्स समजावून सांगत आहेत.

भारतीय संस्कृतीत अग्निहोत्राला महत्त्वाचे स्थान आहे. अग्निहोत्र म्हणजे अग्नीमध्ये आहुती अर्पण करून केली जाणारी ईश्वरी उपासना. सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी केलेली सूर्याची उपासना. कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी हा विधी उपयुक्त असतो.

त्यामधील देशी गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्या, गायीच्या दुधापासून तयार केलेले शुद्ध तूप, तांदूळ, कापूर आदींची अग्निहोत्रात आहुती दिली जाते. त्यामुळे निर्माण होणारा धूर वातावरण प्रसन्न करतो, शरीरास उपयुक्त असतो. हे भारतीय संस्कृतीत सांगितले आहे. पूर्वी ऋषी-मुनी होम-हवन नित्याने करीत असत. आजही अनेकांच्या घरी सुरू आहे. नहेमूद दस्तगीर नदाफ हे गेल्या २५ वर्षांपासून योगा करतात. हे कुटुंब मूळचे सोलापूरचे.

वडील दस्तगीर यांची फळेविक्रीची गाडी होती. आई बेगमबी गृहिणी. पन्नास वर्षांपूर्वी हे दाम्पत्य नगरला स्थायिक झाले. नहेमूद यांना योगासनांची आवड निर्माण झाल्याने त्यांनी योग पंडित, योगा प्राध्यापक, नॅचरोपॅथीचे अभ्यासक्रम पूर्ण केले. नाशिकच्या योग विद्या गुरुकुलमध्ये प्रशिक्षण घेतले.

योगशिक्षक म्हणून त्यांनी सेवा देण्यास प्रारंभ केला. सध्या नगरमध्ये योगतज्ज्ञांत त्यांचे नाव घेतले जाते. या कामी त्यांना योगतज्ज्ञ श्याम शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले. २००६ पासून येथील योगविद्याधाममध्ये ते प्रत्येक शनिवारी अग्निहोत्र करतात व नवोदितांना शिकवितात. यासाठी प्रारंभी दिलीप देशपांडे, सुदाम बनकर यांची साथ मिळत असे. सध्याही मधुकर गायकवाड, बबन बारगळ हे सर्व जण अग्निहोत्र करतात. कोरोनाच्या काळात योगासने, नियमित अग्निहोत्र करणारांना कोणताही त्रास झाला नाही, हा नदाफ यांचा अनुभव खूप काही सांगून जातो.

अग्निहोत्रात्परंनान्यत्पवित्रमिहपठयते॥

सुकृतेनाग्निहोत्रेणशुद्धयंतिभुवि द्विजाः ॥

पद्मपुराणमध्ये अग्निहोत्राचे महत्त्व विशद केले आहे. अग्निहोत्रापेक्षा कोणतेही पवित्र कर्म नाही. चांगल्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या अग्निहोत्राने अंतःकरण पवित्र होते, असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता प्रादेशिक सैन्यातही महिलांना संधी मिळणार, भारतीय लष्कराचा प्रायोगिक तत्वावर विचार

Dombivli Politics: टिळकनगरमध्ये मतदारांचा वेगळा कौल; 'स्थानिकच नगरसेवक हवा, उपरा नकोच'!

Latest Marathi Breaking News : अहिल्यानगर मधील खारेकर्जुन येथे बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकला

Stock Market Today : शेअर बाजाची हिरव्या रंगात सुरुवात; सेन्सेक्स 240 अंकांनी वाढला; तर निफ्टी बँकने उच्चांक गाठला!

Truck Catches Fire: 'ट्रकला आग लागून २९ गायी भस्मसात'; नागपुरातील कत्तलखान्यासाठी गायींची बेकायदा वाहतूक, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT