ahmednagar ashti railway fire accident today news  
अहिल्यानगर

Ahmednagar Ashti Railway: अहमदनगर-आष्टी रेल्वेला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी मारल्या उड्या

कार्तिक पुजारी

अहमदनगर- अहमदनगर-आष्टी रेल्वेला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत रेल्वेचे चार ते पाच डब्बे जळून पूर्ण खाक झाले आहेत. अद्याप जीवितहानी झाल्याची माहिती मिळू शकलेली नाही. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेला आग लागल्यानंतर काही प्रवाशांनी उड्या मारुन आपला जीव वाचवला आहे. आगीमुळे रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे. कोणी प्रवाशी आतमध्ये अडकलाय का हे तपासलं जात आहे. सदर घडनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली.

शिराडोह परिसरात ही आग लागल्याची माहिती आहे. आगीचे कारण समजू शकलेले नाही. पोलिस आणि रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. पाच डब्यांना भीषण आग लागल्याचं समजतंय. आग वाढू नये यासाठी अग्निशमन दल प्रयत्न करत आहे.

सीपीआरओ सेंट्रल रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ८ कोचच्या DEMU रेल्वेला तीनच्या सुमारास अहमदनगर आणि नारायणपूर स्टेशनदरम्यान आग लागली. आग लागताच प्रवाशी डब्ब्यांच्या बाहेर पडले, त्यामुळे कोणालाही दुखापत झालेली नाही. कोणताही प्रवाशी रेल्वेच्या डब्ब्यात अडकलेला नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या रेल्वे प्रशासनाकडून बोलावण्यात आल्या होत्या.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT