Ahmednagar-based company raises salary by Rs 16,000 
अहिल्यानगर

तुम्हाला महिन्याची सॅलरी नसेल, एवढी पगारवाढ केलीय या कंपनीने! बोनस, सुट्ट्यांचीही चंगळ

अमित आवारी

नगर : कोरोना आला नि हजारो, लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. नोकऱ्याच नाहीत म्हणल्यावर पगारवाढीचा विषय लांबच राहिला. परंतु नगरच्या एका कंपनीने कोरोना काळातही कामगारांना भरघोस वाढ केली आहे. तुम्हाला पगार नसेल एवढी त्यांची वेतनवाढ झालीय.

""अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्या माध्यमातून इटन कंपनी व कामगार यांच्यात पगारवाढीचा करार करण्यात आला. या करारामुळे कायम कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे,'' असे प्रतिपादन महापालिकेतील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी केले. 
अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्या प्रयत्नातून एमआयडीसीतील इटन कंपनीतील कायमस्वरूपी कामगारांना तब्बल 16 हजार 758 रुपयांची पगारवाढीचा करार करण्यात आला. ही मल्टीनॅशनल कंपनी आहे. चारचाकी वाहनांचे सुटे भाग या कंपनीत बनतात. 

या वेळी महापालिकेचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, कंपनीचे वरदराजन बालचंद्रन, प्रसन्ना आपटे, भूपेंद्र सिंग, राजेश पेवाल, कामगार प्रतिनिधी वैभव पादीर आदी उपस्थित होते. 

दिवाळी बोनस, इन्शुरन्सचाही लाभ

संतोष लांडे म्हणाले, ""आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, कामगारांचा हक्क मिळवून देण्यासाठी कंपनीशी वारंवार पत्रव्यवहार, पाठपुरावा करून बैठका घेत चर्चा करण्यात आली. मेडिकल इन्शुरन्स, दिवाळी बोनस, सुट्या, कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास मदतीच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Ministers: मंत्री घेणार आलिशान गाड्या; राज्यपाल अन् मुख्यमंत्र्यांसाठी तर मर्यादाच नाही, किती पैसे मंजूर?

Latest Maharashtra News Updates : सुसगावकडे जाणारी बस पाण्याचा अंदाज न आल्याने थेट खड्यात अडकली

Nashik News : नवरात्रोत्सव सुरू होण्याआधी भगूरमधील रस्त्यांची दुरवस्था; भाविकांना त्रासाला सामोरे जावे लागणार

Chakur News : सहकारमत्र्यांकडून कृषी कार्यालयाचा पंचनामा; कृषी अधिकाऱ्यासह सात कर्मचारी गैरहजर

Nashik Railway Station : नाशिक रेल्वे स्थानक कुंभमेळ्यासाठी सज्ज होणार; रेल्वे प्रशासनाची तयारी सुरू

SCROLL FOR NEXT